माळशिरस /प्रतिनिधी –
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्याच्या सीमेलगत होणाऱ्या बहुचर्चित म्हसवड- धुळदेव इंडस्ट्रियल कॉरिडॉर मध्ये माळशिरस तालुक्यातील गारवड गावाचा समावेश झाला असून गारवड मधील जवळपास चार हजार पाचशे एकर जमीन संपादित करणे कामी इंडस्ट्रियल कॉरिडॉर समिती व त्या संदर्भात असणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांचा नुकताच पाहणी दौरा झाला असून यामध्ये माळशिरस तालुक्यातील गारवडचा समावेश होणार असल्याची माहिती इंडस्ट्रियल कॉरिडॉर समितीचे अध्यक्ष ॲड.सोमनाथ वाघमोडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
यावेळी किशोर सूळ, युवा उद्योजक अमोल यादव, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष अजित बोरकर, भानुदास सालगुडे पाटील, बाजीराव माने आदी मान्यवर उपस्थित होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा स्वप्नवत असणारा हा इंडस्ट्रियल कॉरिडॉरचा उपक्रम असून संपूर्ण भारतात असे पाच इंडस्ट्रियल कॉरिडॉर होत होणार आहेत. ग्रामीण बोलीभाषेत याच इंडस्ट्रियल कॉरिडॉरला फाईव्ह स्टार एमआयडीसी असेही संबोधले जाते सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्याच्या सरहद्दीवर होणाऱ्या या इंडस्ट्रियल कॉरिडोरच्या लगतच असणाऱ्या गारवडचा समावेश व्हावा यासाठी ॲड.सोमनाथ वाघमोडे सातत्याने प्रयत्नशील होते अखेर त्यांच्या या लढ्याला यश आले असून गारवडचा समावेश या इंडस्ट्रियल कॉरिडॉर मध्ये होणार असल्याने या भागातील शेतकऱ्यांसह जनतेतून समाधान व्यक्त केले जात आहे.
सन २०१२ पासून माळशिरस तालुक्यात एमआयडीसी व्हावी यासाठी कोथळे, कारुंडे, पिंपरी याचबरोबर शेती महामंडळाच्या जमिनीवर एमआयडीसी करण्यासाठी ही प्रयत्न केला गेला परंतु सातत्याने त्यास विरोध होत गेला अखेर माळशिरस तालुक्याच्या दक्षिणेकडील व कायमच दुष्काळी पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गारवड या गावात छ.उदयनराजे भोसले यांच्या मालकीची एकाच ठिकाणी व एकाच मालकाची अशी चार हजार पाचशे एकर जमीन छ.उदयनराजे भोसले, छ.कल्पनाराजे भोसले यांनी या कॉरिडॉर साठी देण्यासाठी संमती पत्र दिले याबाबत अनेकदा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, तत्कालीन केंद्रीय उद्योग राज्यमंत्री प्रकाश, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आरोग्यमंत्री डॉ.तानाजीराव सावंत, उद्योग मंत्री उदय सामंत, तत्कालीन खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासह अनेक राजकीय पुढाऱ्यांच्या भेटी घेऊन याबाबत प्रयत्न केल्याने यश आल्याचे ॲड.सोमनाथ वाघमोडे यांनी सांगितले.