करमाळा, प्रतिनिधी – खरेदी विक्री संघांचे चेअरमन, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक युवक नेते शंभूराजे जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ३८ सेकंदात ४,२७८ वृक्षलागवडीचा विश्वविक्रम शुक्रवार दि. १६ रोजी करण्यात आला. यावेळी एकूण ४,७०० झाडे लावण्यात आली.
शहरातील मौलाली नगर परिसरात महात्मा गांधी विद्यालयासह शहरातील अनेक शाळांचे विद्यार्थी या वृक्षलागवडीत सहभागी झाले होते. यावेळी सहायक आयुक्त वीणा पवार, मुख्याधिकारी सचिन तपसे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव विठ्ठल क्षीरसागर, वनाधिकारी नंदर्गे, ॲड. नवनाथ राखुंडे, संदीप सरडे, शुभम बोराडे, सोमा पठाडे, रेखा परदेशी, ज्योतीराम ढाणे, विक्रम ढाणे, ग्लोबल इंग्लिश मीडियम स्कूलच्या एलिझाबेथ आसादे, स्वराज अकॅडमीचे विद्यार्थी व शिक्षक तसेच अनिल सुरवसे भाऊसाहेब, इजराइल कुरेशी, रील स्टार दिक्षा शिंदे, साहिल मुलाणी, आफताब मुलाणी, रियाज सय्यद, आकाश सिंधी, गुरू चव्हाण, अतुल देवकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी सहभाग घेतला होता.