अक्कलकोट : तालुक्यातील साफळे गावातील घरासमोरील सिमेंटरोड वर दीड वर्षाच्या मुलास पिकअप वाहनाची धडक बसून मयत झाल्याची घटना आज बुधवारी सकाळी नऊ वाजणेच्या सुमारास घडली. दुर्घटना घडताच पिकअप चालकाने घाबरून धूम ठोकली.
शंकरलिंग लक्ष्मीकांत पाटील (वय- दीड वर्षे रा.साफळे ता.अक्कलकोट ) असे अपघातात मयत झालेल्या चिमुकल्या मुलाचे नाव आहे. पिकअप चालक सचिन बरगली बंदीछोडे (रा.साफळे ) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याची उत्तर पोलीस स्टेशनमध्ये नोंद झाली आहे. पिकअप चालकाने पिकअप (क्रमांक एम .एच.१३ सी यु ८७९०) हयगयीने, अविचाराने रस्त्याचे परीस्थितीकडे दुर्लक्ष करून चालवून चिमुकल्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दुर्घटना घडताच पिकअपचालकाने धूम ठोकली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
फिर्याद गुडेराय चंद्रशा निंगदाळे ( वय- ४० वर्षे, रा. साफळे) यांनी दिली. स्वामीनाथ पाटील हे त्यांचे कुटुंबासह साफळे येथे राहण्यास आहेत. आज सकाळी नऊ वाजण्याचा सुमारास एक पिकअप गाडी माल भरून अक्कलकोटकडे निघाला होता. स्वामीनाथ पाटील यांचे घरासमोर त्यांचा मुलगा शकरलिंग हा रस्त्यावरून घराकडे चालत निघाला होता. पिकअपने मुलास जोराची धडक दिली. यात मुलाचे डोकीस, दोन्ही हातास, खांद्यास मार लागून जखमी झाल्यामुळे कानातून रक्तस्त्राव झाला. जखमी मुलास अक्कलकोट ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्याची तपासणी करून मृत घोषित केले.