Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: काय सांगताय ? पंढरपुरात कोणाची होतेय चांदी? कोण होतंय मालामाल?
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

काय सांगताय ? पंढरपुरात कोणाची होतेय चांदी? कोण होतंय मालामाल?

admin
Last updated: 2025/03/20 at 11:33 AM
admin
Share
2 Min Read
SHARE

राजेश कदम

पंढरपूर :
सोलापूर जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून द्राक्ष आणि बेदाण्याच्या दरामध्ये सातत्याने पडझड होत होती. मात्र यंदा बेदाण्याचे उत्पन्न कमी झाल्याने बेदाण्याला चढा भाव मिळू लागला आहे. पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पंढरपूर तालुक्यातील जाधववाडी येथील नवनाथ कोरडे या शेतकर्‍याच्या बेदाण्याला मंगळवारी विक्रमी 651 रुपयांचा दर मिळाला आहे. हा दर महाराष्ट्रातला विक्रमी दर मानला जात आहे.

यावर्षी द्राक्षाचे उत्पन्न जवळपास 50 टक्के घटल्याने बेदाणेही खूप कमी प्रमाणात तयार झाले आहेत. सर्वसाधारण गोल बेदाण्याला अडीचशे रुपयापर्यंतचा दर मिळत असून व्यवस्थित पद्धतीने निवडून आणलेल्या लांब बेदाण्याला विक्रमी भाव मिळू लागला आहे. पंढरपूर बाजार समितीत नवनाथ कोरडे यांनी आणलेला बेदाणा हा जवळपास एक ते दीड इंच लांबीचा असून पूर्णपणे वाळलेला आणि अतिशय चांगला रंग असलेला या बेदाण्याला चक्क 651 रुपये प्रति किलो एवढा विक्रमी भाव मिळाला आहे.

बाजार समितीतील व्यापारी विशाल मर्दा यांच्याकडे कोरडे यांनी आपला बेदाणा विक्रीसाठी आणला होता. मंगळवचारी झालेल्या लिलावात सांगलीच्या सारडा या व्यापार्‍यांनी कोरडे यांचा बेदाणा 651 रुपये एवढ्या विक्रमी दराने खरेदी केला आहे. यावेळी बोलताना शेतकरी नवनाथ कोरडे यांनी बागेत संपूर्ण घरदार राबवत असल्याने इतका चांगला दर मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी बाजार समिती व व्यापार्‍यांच्या वतीने नवनाथ कोरडे यांचा सत्कार करण्यात आला.

यावर्षी बेदाण्याचे उत्पन्न कमी शेतकर्‍यांनी प्रति एकर उत्पन्नापेक्षा कॉलिटीवर लक्ष दिल्यास आणि बेदाणा निवडताना ग्रेडिंग मशीन ऐवजी माणसांचा वापर केल्यास चांगल्या प्रतीचा बेदाणा निघू शकेल, अशी अपेक्षा व्यापारी विशाल मर्दा यांनी व्यक्त केली आहे. तर यावर्षी बेदाण्याचे उत्पन्न कमी असल्याने शेतकर्‍यांना या सीझनमध्ये अतिशय चांगले दर मिळतील असे सांगताना आज भारतातही व्यापार्‍यांकडे 25 टक्क्यांपेक्षा कमी बेदाणा असल्याने हा संपूर्ण सीजन शेतकर्‍यांना जास्तीचे पैसे मिळवून देणारा असेल असे व्यापारी सारडा यांनी सांगितले. दरम्यान,

यावर्षी बदलत्या वातावरणाचा द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांना मोठा फटका बसला आहे. अनेक शेतकर्‍यांच्या द्राक्ष उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळं यावर्षी द्राक्ष आणि बेदाण्याला चांगले दर राहतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. पंढरपूरची नेहमीच आघाडी बेदाणा लिलावात पंढरपूर मार्केट कमिटी आघाडीवर असते.प.महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमधून बेदाणा याठिकाणी लिलावास येत असतो.त्यामुळे तिथे किती आणि कसा भाव मिळतो,याकडे प.महाराष्ट्रातील द्राक्ष उत्पादकांचे लक्ष लागून असते आता सोलापुरातही बेदाणाचे लिलाव सुरू झाले आहेत.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article काय सांगता? नेतेमंडळींनी ‘असा’ दाखवला रंग, ‘असे’ उडविले राजरंग !
Next Article ‘सीईओ’ हातात घेणार छडी? कोणत्या विभागाच्या सफायासाठी ?

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?