Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: जिल्हाधिकाऱ्यांच्या पाठीवर “या” कारणामुळे कौतुकाची थाप !
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

जिल्हाधिकाऱ्यांच्या पाठीवर “या” कारणामुळे कौतुकाची थाप !

admin
Last updated: 2025/03/22 at 11:37 AM
admin
Share
4 Min Read
SHARE

प्रतिनिधी
सोलापूर:
मुख्यमंत्री महोदयांच्या सूचनेप्रमाणे राज्यात सर्वत्र 100 दिवसीय कृती आराखड्याची अत्यंत प्रभावीपणे अंमलबजावणी केली जात आहे. सोलापूर जिल्ह्यात या अंतर्गत काम सुरू आहे. या कार्यक्रमातून सर्वसामान्यांचा शासकीय कार्यालयाकडे पाहण्याचा पूर्वीचा नकारात्मक दृष्टिकोन बदलून सकारात्मक दृष्टिकोन व्हावा तसेच या कार्यक्रमांतर्गत राज्यस्तरावर सोलापूर जिल्ह्याचा प्रथम क्रमांक आला पाहिजे असे आवाहन विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले.

नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित 100 दिवसीय कृती आराखडा कार्यक्रमाच्या आढावा बैठकीत श्री पुलकुंडवार मार्गदर्शन करत होते. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे, पोलीस शहर आयुक्त एम. राजकुमार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकुर, उपजिल्हाधिकारी महसूल तथा प्रभारी उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांच्यासह सर्व संबंधित विभाग व कार्यालय प्रमुख उपस्थित होते.

विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार म्हणाले की या शंभर दिवशी कृती आराखडा कार्यक्रमात जिल्ह्यातील राज्य शासनाच्या सर्व शासकीय कार्यालयानी सक्रिय सहभाग घेणे बंधनकारक आहे जरी अद्याप पर्यंत याच सहभागी झालेले नाहीत अशा कार्यालयाने जिल्हा प्रशासनाशी संपर्क करून आराखड्यातील सात सुत्री कार्यक्रमाची अत्यंत प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. सोलापूर जिल्हा प्रशासन या अंतर्गत चांगले काम करत असून या अंतर्गत राज्यस्तरावर जिल्ह्याचा प्रथम क्रमांक येण्यासाठी सर्व कार्यालय प्रमुखांनी अत्यंत काटेकोरपणे नियोजन करावे असे आवाहन त्यांनी केले.

या अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयाचा पोट खराबा जमीन तसेच बिगर शेती असलेल्या जमिनीसाठी सनद वाटप कार्यक्रम हा अत्यंत चांगला असून राज्यातील इतर जिल्ह्यापेक्षा वेगळा व लोकांसाठी खूप महत्त्वपूर्ण कार्यक्रम असल्याचे डॉ. पुलकुंडवार यांनी सांगून अभिलेखासाठी स्वतंत्र अधिकारी नियुक्त करून त्या अनुषंगाने अभिलेखाचे निंदनीकरण व सुसूत्रीकरण केले जात असल्याबद्दलही त्यांनी समाधान व्यक्त केले. त्याप्रमाणेच सोलापूर जिल्हा परिषद तसेच महापालिका अंतर्गत येणाऱ्या सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवून घेण्याची कार्यवाही त्वरित पार पाडावी. यासाठी आवश्यक निधी शासकीय तसेच सीएसआर फंडातून उपलब्ध करून घ्यावा, असेही त्यांनी सूचित केले.

सर्व कार्यालय प्रमुखांनी त्यांचे कार्यालय तसेच कार्यालय परिसर कार्यालयातील स्वच्छता घरे तसेच अभ्यागतासाठी असलेली स्वच्छतागृहे कायम स्वरुपी स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी त्या त्या कार्यालय प्रमुखाची असेल जिल्हास्तर तसेच तालुका स्तरावरील सर्व कार्यालय प्रमुखांनी या अनुषंगाने आवश्यक कार्यवाही करावी. आपण केलेल्या कामकाजाचे श्रेष्ठ संस्थेकडून तपासणीचे काम लवकरच सुरू होणार आहे तरी यात आपला जिल्हा चांगले कामकाज करेल यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असेही त्यांनी सुचित केले.

तसेच जिल्ह्यात गुंतवणूक झाल्यानंतर उद्योग वाढ मोठ्या प्रमाणावर होऊ शकते त्या अनुषंगाने गुंतवणूक तसेच पायाभूत प्रकल्पासाठी कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही असे प्रयत्न केले पाहिजेत. जिल्ह्याचे वातावरण उद्योग स्नेही असले पाहिजे. या अंतर्गत कोणीही अडचण करत असेल तर संबंधितावर मुख्यमंत्री कार्यालयाकडून लक्ष ठेवले जात असल्याचेही विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी सुचित केले.

यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सोलापूर जिल्हा प्रशासन 100 दिवशी कृती आराखड्या अंतर्गत करत असलेल्या कामकाजाची सविस्तर माहिती दिली. तसेच नाविन्यपूर्ण कामकाजाची ही माहिती त्यांनी दिली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात येत असलेल्या कामकाजाची माहिती सादर केली.

प्रारंभी उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर यांनी या अंतर्गत महसूल प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असलेल्या कामकाजाचे सादरीकरण केले. यावेळी प्रांत स्तरावर प्रांताधिकारी व तालुकास्तरावर तहसीलदार, गटविकास अधिकारी यांच्यासह तालुकास्तरीय अधिकारी ऑनलाइन पद्धतीने उपस्थित होते.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मुलांसह विवाहिता बेपत्ता, घरच्यांची उडाली झोप
Next Article “सुखद” बातमी; आपण ‘ती’ वाचायला हवी !

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?