Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: औरंगजेबाची कबर राष्ट्रीय स्मारकांच्या व्याख्येत बसत नाही, हायकोर्टात याचिका
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

औरंगजेबाची कबर राष्ट्रीय स्मारकांच्या व्याख्येत बसत नाही, हायकोर्टात याचिका

admin
Last updated: 2025/03/22 at 6:32 PM
admin
Share
4 Min Read
Aurangzeb tomb not fit definition national monumen
SHARE

मुंबई, २२ मार्च (हिं.स.) : मुघल बाहशाह औरंगजेबाची खुलताबाद येथे असलेली कबर राष्ट्रीय स्मारकांच्या व्याख्येत बसत नाही. त्यामुळे, ती हटवण्याचे आदेश भारतीय पुरातत्व विभागाला (एएसआय) द्यावेत, अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आली आहे. या कबरीपासून पुढल्या पिढीने वारसा म्हणून काही घ्यावे किंवा शिकवण घेण्यासारखे काहीही नाही. त्यामुळे, या कबरीला ऐतिहासिक वारसा वास्तू किंवा राष्ट्रीय स्मारकांच्या यादीतून वगळण्यात यावे, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी या याचिकेद्वारे केली आहे. याबाबत लवकरच सुनावणी अपेक्षित असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

प्राचीन स्मारके आणि पुरातत्व स्थळे आणि अवशेष कायद्याच्या कलम ३ मध्ये राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जाणाऱ्या स्मारकांची व्याख्या नमूद आहे. परंतु, ही व्याख्या औरंगजेबच्या कबरीला लागू होत नाही. औरंगजेबच्या कारकीर्दीचा काळ हा भारतीय इतिहासातील एक काळे पान आहे. या काळात हिंदू महिलांवर अत्याचार करण्यात आले, हिंदू मंदिरांचा नाश करण्यात आला. याच औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराज यांना कपट करून ताब्यात घेतले आणि त्यांचा ४० दिवस अतोनात, अमानवी छळ केला. खुलताबाद येथील त्याच दर्ग्यातील इतर कबरींबाबतही असाच काळा इतिहास आहे. औरंगजेबासह या व्यक्तींना भारतीय इतिहासात राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्व नाही आणि त्यांचा भारतीय समाजावर कोणताही महत्त्वपूर्ण प्रभाव पडलेला नाही, असा दावाही याचिकेत करण्यात आला आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच सभागृहात औरंगजेब हा एक क्रूर शासक होता आणि त्याने छत्रपती संभाजी महाराजांचा क्रूरपणे छळ केल्याचे म्हटले होते. त्याशिवाय, औरंगजेबाबाबत कौतुकाची विधाने केल्याबद्दल समाजवादी पक्षाचे आमदार अबू असीम आझमी यांना अलिकडेच सभागृहातून निलंबित करण्यात आले होते. आझमी यांनी कोणावरही टीका केली नव्हती. परंतु, औरंगजेब हा छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे प्रशासनात कुशल होता, असे वक्तव्य केले होते. तसेच, त्यांचे निलंबन हे छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दलचा आदर आणि औरंगजेबाची क्रूरता यांबाबत जनतेच्या भावनेचा प्रतिसाद होता. औरंगजेबाच्या कबरीवरून नागपूर येथे दोन गटांत वाद होऊन दंगल उसळली. या सगळ्या घडामोडीमागे औरंगजेबाची कबर मूळ कारण आहे. त्यामुळे, पुरातत्त्व सर्वेक्षण कायद्यातील तरतुदींनुसार राष्ट्रीय स्मारकाच्या व्याख्येत न बसणारी औरंगजेबची कबर राष्ट्रीय स्मारकांच्या यादीतून वगळण्याचे आदेश भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाला द्यावेत. याशिवाय, खुलताबाद येथील औरंगजेबची कबर तसेच हैदराबाद निजाम असफ जाह पहिला आणि औरंगजेबचा मुलगा, मुलगी यांच्या दर्ग्यात असलेल्या इतर कबरीही पाडण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करण्याचे आदेश सरकारला देण्याची मागणी याचिकाकर्त्याने केली आहे.

कबर पुरातत्व विभागाच्या यादीतून वगळली की राज्य सरकारनं ती तिथून कायमची हटवून टाकावी, जेणेकरून भविष्यात पुन्हा यावरून जातीय तेढ निर्माण होणार नाही असे मत केतन तिरोडकर यांनी व्यक्त केलं आहे. याशिवाय छावा सिनेमाच्या प्रदर्शनावर तूर्तास बंदी घालण्याबाबतही राज्य सरकारनं विचार करण्याची विनंती या याचिकेतून करण्यात आली आहे. दरम्यान, औरंगजेबाच्या कबरीवरुन राज्यातील वातावरण चांगलच गरम झाल्याचं पाहायला मिळत आहे. औरंगजेबाची कबर उखडण्याच्या मुद्द्यावरुन नागपूरमध्ये दंगलही उसळली होती. या प्रकरणानंतर सुरक्षा व्यवस्था चोख करण्यात आली आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात औरंगजेबची कबर हटवण्याच्या मागणीसंबंधीचा वाद वाढतच चालला आहे. या संदर्भात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत प्रकरणाची तातडीने सुनावणी घेण्याची मागणी करण्यात आली आहे.

हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेत केतन तिरोडकर यांनी असा युक्तिवाद केला आहे की, औरंगजेबचा मकबरा राष्ट्रीय स्मारकांच्या व्याख्येत बसत नाही. त्यातून पुढच्या पिढीला वारसा म्हणून देण्यासारखे किंवा शिकण्यासारखे काहीही नाही. त्यामुळे याचिकेत मागणी करण्यात आली आहे की, केंद्रीय पुरातत्त्व विभागाने महाराष्ट्रातील खुलताबाद, संभाजीनगर येथील औरंगजेबच्या कबरीला ऐतिहासिक स्मारकांच्या यादीतून हटवण्याचे निर्देश द्यावेत.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article दिशा सालियन मृत्यू : वडिलांची हायकोर्टात रिट याचिका, २ एप्रिलला सुनावणी दिशा सालियन मृत्यू : वडिलांची हायकोर्टात रिट याचिका, २ एप्रिलला सुनावणी
Next Article Dismiss the Waqf Board which has not submitted audit reports for seventeen years - Adv. Virendra Ichalkaranjikar सतरा वर्षे लेखापरीक्षण अहवाल सादर न करणारे वक्फ बोर्ड बरखास्त करा – ॲड. वीरेंद्र इचलकरंजीकर

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?