Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: जिजाऊ रथ यात्रा सोलापुरात येणार पण कधी ?
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

जिजाऊ रथ यात्रा सोलापुरात येणार पण कधी ?

admin
Last updated: 2025/03/23 at 10:17 AM
admin
Share
3 Min Read
SHARE

सोलापुरी माता जिजाऊ प्रेमींकडून स्वागताची जय्यत तयारी

प्रतिनिधी
सोलापूर : मराठा सेवा संघ महाराष्ट्र आयोजित ’मराठा जोडो अभियान’ अंतर्गत संपूर्ण राज्यात जिजाऊ रथ यात्रेचं आयोजन केले आहे. संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांच्या सूचनेनुसार मंगळवारी, 18 मार्च शहाजी महाराज यांच्या जयंती दिनी वेरूळ गढी येथून रथ यात्रेस मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला, मंगळवारी, 25 मार्च रोजी सायंकाळी जिजाऊ रथ यात्रेचं सोलापूर शहरात छत्रपती संभाजी महाराज चौकात भव्य स्वागत होईल, या स्वागताची जय्यत तयारी सोलापुरातील तमाम माता जिजाऊ प्रेमींकडून केली जात आहे

सोलापूर शहरातील सर्व सामाजिक, राजकीय, व्यावसायिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर स्वागतासह मिरवणुकीला उपस्थित राहणार आहेत. स्वागतानंतर अनेकविध पथकांच्या सोबत वाद्यासह रथयात्रा मिरवणुकीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात अभिवादन व पूजन करून चार हुतात्मा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन होईल. 7.00 वाजता नंतर चार हुतात्मा चौकात शाहीर पोवाडे चा कार्यक्रम व त्यानंतर त्याच ठिकाणी मार्गदर्शनपर सभेचे आयोजन केले आहे. अशी माहिती जिल्हाध्यक्ष प्रा. शिवश्री डॉ. जी. के. देशमुख यांनी दिली.45 दिवसांच्या प्रवासानंतर पुणे येथील लाल महलात जिजाऊ रथ यात्रेची सांगता होईल. रथयात्रेसोबत संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभ खेडेकर, मराठा सेवा संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक प्रा. अर्जुनराव तनपुरे यांचेसह केंद्रीय पदाधिकारी आहेत.

का काढली जिजाऊ रथ यात्रा ?
सध्या समाजात एकमेकात असणारा संवाद, समन्वय, ओलावा कमी होताना दिसत आहे. यामुळे निर्माण होणार्‍या अडचणी संभ्रम दूर व्हावा. धार्मिक, जातीय व सामाजिक सलोखा निर्माण व्हावा, यासाठी पुरुषोत्तम खेडेकर यांनी संपूर्ण समाजाला चला पुन्हा एकदा एक होऊन सर्व शक्तिमान होऊ या, वाद मिटवून संवाद साधूया अशी एकत्र येण्याची हाक दिली आहे. म्हणून जिजाऊ शिवरायांचा एकीचा व नेकीचा संदेश घेऊन ही जिजाऊ रथ यात्रा मंगळवारी सायंकाळी सोलापुरात दाखल होत आहे. राष्ट्रमाता जिजाऊंचे दर्शन आणि जिजाऊ शिवरायांचे विचार घेण्यासाठी सोलापुरातील सर्व समाजातील बांधव व भगिनींनी बहुसंख्येने रथयात्रेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन शहराध्यक्ष शिवश्री सूर्यकांत पाटील यांनी केले.

हे शिलेदार घेताहेत परिश्रम
रथ यात्रेच्या नियोजनासाठी समन्वयक दत्तामामा मुळे, उपाध्यक्ष बब्रुवाहन माने-देशमुख, संभाजी ब्रिगेड अध्यक्ष सोमनाथ राऊत, उपाध्यक्ष सदाशिव पवार, सेक्रेटरी लक्ष्मण महाडिक, केंद्रीय सदस्य विश्‍वनाथ गायकवाड, संभाजी ब्रिगेडचे प्रकाश ननवरे, मराठा सेवा संघाचे आर. पी. पाटील, राम माने, आदी मराठा सेवा संस्थेचे पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.

जिजाऊ रथाच्या आगमनाचे असे आहे वेळापत्रक
सोलापूर जिल्ह्यात रविवारी, 23 मार्च रोजी सांगोला येथे रथयात्रेचे आगमन व स्वागत होईल. मिरवणुकीनंतर पंढरपूरला मुक्काम होईल. पुढे अकलूज, टेंभुर्णीमार्गे येऊन कुर्डूवाडीला मुक्काम. मंगळवारी, 25 मार्चला कुर्डूवाडी, माढा, अनगर, मोहोळमार्गे सायं 5.30 वाजता सोलापूर शहरात छत्रपती संभाजी महाराज चौकात जिजाऊ रथ यात्रेचे भव्य स्वागत होईल.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article नायब तहसीलदाराला ढकलून पळविली वाळू, पण कुठे ?
Next Article सत्तूरने सपासप वार झाले, अन् .तो पडला रक्ताच्या थारोळ्यात.पण कुठे?

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?