सोलापूर : एका चार चाकी वाहनातून बेकायदेशीर विदेशी दारूच्या बाटल्या जोडबसवण्णा चौक ते जिजामाता दवाखाना मार्गे जाणार असल्याची अवैद्य वाहतूक जेलरोड पोलिसांनी हाणून पाडला. चार चाकी वाहनांसह तीन लाख 12 हजार 310 रुपये रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यात सिद्धाराम राचाप्पा खजूरगी (वय-45,रा.नीलम नगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
यात मिळालेली माहिती अशी की, जेलरोड ठाणे कार्यक्षेत्रात रमजान सणानिमित्त पोलीस ठाणे हद्दीत अवैद्य धंद्यावर कारवाई करण्यासाठी तपासकीटसह वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत व सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश सोनवणे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार गंगावणे, नदाफ, खान व पोलीस कॉन्स्टेबल सिनारे असे सर्वजण पेट्रोलिंग करीत होते. गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की ग्रे कलरच्या मारुती सुझुकी वॅगनार एम एच 20 बी. वाय. 7781 यातून देशी-विदेशी दारूच्या बाटल्या जोडबसवण्णा चौक ते जिजामाता दवाखाना मार्गे वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार सापळा लावून चारचाकी वॅगनारच्या चालकाला जिजामाता दवाखाना ते जेलरोड पोलीस ठाणे दरम्यान असलेल्या नेताजी सुभाष चंद्रबोस बगीचा जवळ थांबविले. त्याच्याकडे चौकशी केली असता उडवा उडवीचे उत्तरे देत असल्याने विश्वासात घेऊन गाडीची पाहणी केली. यावेळी गाडीत 11 खाकी पुठ्ठ्याच्या बॉक्स व पाच पांढर्या पिशव्यात विदेशी दारूच्या बाटल्या मिळून आल्या. त्याच्याकडून एक वॅगनर कारसह एकूण तीन लाख 12 हजार 310 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच संशयित आरोपीला पुढील तपासाठी ताब्यात घेतले आहे.