Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: गतवर्षीच्या तुलनेत गुन्ह्यांमध्ये घट? शोधही जोरात? कोण म्हणाले असं ?
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

गतवर्षीच्या तुलनेत गुन्ह्यांमध्ये घट? शोधही जोरात? कोण म्हणाले असं ?

admin
Last updated: 2025/03/23 at 10:48 AM
admin
Share
3 Min Read
SHARE

सोलापूर : कोल्हापूर परिक्षेत्र विभागात वेगवेगळ्या प्रकारच्या गुन्ह्यात मागील वर्षाच्या मानाने यंदा घट झाली आहे.नवनवीन ॲप,तंत्रज्ञान यांचा वापर करून गुन्हेगारांचा शोध घेतला जात आहे. ही जमेची बाजू असली तरी ग्रामीण भागात विशेषता दुचाकी ,ट्रॅक्टर चे रस्त्यावरील अपघात हा चिंतेचा विषय आहे. या दृष्टीने सायंटिफिक माहिती घेऊन त्यावर उपाययोजना करण्यावर भर दिला जाणार असल्याची माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.या अपघाताचे मॉनिटरिंग दिल्लीवरून होते. असेही त्यांनी सांगितले

वार्षिक तपासणी अनुषंगाने फुलारी गेल्या दोन दिवसापासून सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून शनिवारी सायंकाळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
राज्य शासनाने आखलेल्या शंभर दिवसाच्या कार्यक्रमातील सात कार्यक्रमावर आधारित सध्या इतर खात्याबरोबर पोलीस खात्यात सुद्धा कामकाज सुरू असून जनतेला देण्यात येणाऱ्या सेवा सुविधा ,पोर्टल ॲप चा वापर करून या उपक्रमात सोलापूर ग्रामीण पोलीस निश्चित क्रमांक मिळेल असा आशावाद ही सुनील फुलारी यांनी यावेळी बोलून दाखवला. २०२४ हे वर्ष कोल्हापूर परिक्षेत्राच्या अनुषंगाने मोठे आव्हानात्मक होते .कारण या वर्षात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका झाल्या. निवडणुका आणि मतमोजणी या दिवशी परिक्षेत्रातील पाचही जिल्ह्यात तुरळक घटना वगळता कुठे मोठ्या पद्धतीने गुन्हे घडले नाहीत.या काळात जवळपास ६०हजार च्या आसपास कारवाया केल्या‌‌ त्यामुळे या निवडणुका शांततेत पार पडला पडले असल्याचेही फुलारी यांनी सांगितले.

या परिक्षेत्रातील बरासा भाग हा कर्नाटक सीमावर्ती भाग असल्याने नाकाबंदीवर भर दिला होता. पाच जिल्ह्यात १५ बुथ आणि ३० हजार कर्मचाऱ्यांचा वापर करण्यात आला. कोल्हापूर परिक्षेत्रात महिला विषयक व पोस्को विषयक गुन्हा मध्ये घट झाल्याचे आढळून आले तसेच शरीर विषय व संपत्ती विषयक गुन्ह्यातही घट झाली. गुन्ह्यात जप्त केलेला मुद्देमाल नागरिकांना परत देण्याच्या दृष्टीने सुद्धा पाचही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भर देण्यात आला. रिकव्हरीच्या संदर्भात सातत्याने प्रशिक्षण दिले जात आहे. कायदा आणि सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पुढे येणाऱ्या सण उत्सवाच्या निमित्ताने तयारी चालू आहे असेही त्यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेस पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी,अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर,गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय निंबाळकर,उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना मीना यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख पोलीस अधिकारी उपस्थित होते.

 

चौकट…

क्यू आर कोड पेट्रोलिंग प्रणाली

सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलीस विभागाने क्यू आर कोड पेट्रोलिंग ही प्रणाली गुन्हेगारांच्या तपासाच्या अनुषंगाने पुढे आणली आहे. व त्याच चांगला प्रतिसाद आहे या ॲपमुळे क्राईम मॅपिंग ला उपयोग होतोय

चौकट…..

संपूर्ण राज्यभरात शंभर दिवसाचा सात सूत्री उपक्रम

महाराष्ट्र शासनाने गेल्या महिनाभरापासून संपूर्ण राज्यभरात शंभर दिवसाचा सात सूत्री उपक्रम सर्वच शासकीय कार्यालयात सुरू केला यात सोलापूर ग्रामीण पोलीस ग्रामीण पोलीस पथक आघाडीवर येईल असा विश्वास व्यक्त केला.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article जलजीवनच्या १४६ कामांना आर्थिक जलसंजिवनी, पण कुठे? प्रकरण काय आहे?
Next Article 58 लाखाला लावला चुना, पण कुठे? प्रकरण काय ?

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?