सोलापूर (प्रतिनिधी) पार्क चौक येथील आयसीआयसीआय बँकच्या एटीएम मध्ये एक अनोळखी इसमाने फिर्यादी दत्तात्रय मच्छिंद्र निकंबे (वय-६८,रा.मु.पोस्ट देगाव) यांना पैसे काढून देण्याच्या बहाण्याने एटीएम पिन विचारून दत्तात्रय निकंबे यांच्याकडून एटीएम कार्ड घेऊन हात चालाकीने एटीएमची अदलाबदल करून
बँक खात्यातून परस्पर दोन वेळा मिळून एकूण पंधरा हजार चारशे रुपयांची रक्कम काढून घेऊन फिर्यादी यांची फसवणूक केली आहे.ही घटना ११ मार्च रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली.याप्रकरणी दत्तात्रय निकंबे यांनी सदर बझार पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून,त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.या घटनेचा पुढील तपास पोसई.पाटील हे करीत आहेत.