Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पंढरीत १०३ कोटींचे पुन्हा टेंडर, वारकऱ्यांना ‘हा’ मिळणार दिलासा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

पंढरीत १०३ कोटींचे पुन्हा टेंडर, वारकऱ्यांना ‘हा’ मिळणार दिलासा

admin
Last updated: 2025/03/23 at 10:57 AM
admin
Share
3 Min Read
SHARE

विठ्ठल मंदिर टोकन दर्शन अन् स्काय वॉकच्या रद्द केलेली निविदा पुन्हा प्रसिद्ध दोन तासात दर्शन होण्याचा मार्ग मोकळा

पंढरपूर-प्रतिनिधी
पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरासाठी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजूर केलेले आणि विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शंभर दिवस कार्यक्रमात घेतलेली दर्शन मंडप स्काय वॉकची रद्द झालेली निविदा शनिवारी अखेर पुन्हा प्रकाशित केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने ही निविदा पुन्हा प्रकाशित केली आहे. राज्याच्या आजी-माजी मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठा कोण? अशा शब्दात रद्द निविदेचे वाभाडे बाहेर काढल्यावर शासन स्तरावर जोरदार हालचाली सुरू झाल्या. आज अखेर ही निविदा पुन्हा प्रकाशित झाल्याने या वादावर आता पडदा पडला आहे.

राज्याचे दोन्ही आजी-माजी मुख्यमंत्र्यानी लाखो भाविकांचे दर्शन सुलभ होण्यासाठी हा प्रकल्प मंजूर केला होता. याला राज्याच्या प्रशासकीय शिखर समिती आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या अंतिम समितीने देखील मंजुरी दिल्यावर पहिली निविदा निघाली होती. मात्र असे असतानाही प्रसिद्ध झालेली निविदा सार्वजनिक बांधकाम विभागाने अचानक रद्द केल्यामुळे आजी-माजी मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठे कोण? असा सवाल केला जात होता.
अखेर पुन्हा एकदा सार्वजनिक बांधकाम विभागाने 103 कोटी 79 लाख रुपयाची ही निविदास प्रसिद्ध केल्याने लाखो विठ्ठल भक्तांना दिलासा मिळाला आहे. मात्र तरीही यापूर्वी प्रसिद्ध झालेली निविदा कोणाच्या सांगण्यावरून रद्द झाली, याची चौकशी करून कठोर कारवाईची मागणी विठ्ठल भक्त आणि वारकरी संप्रदायातून होत आहे.

नेमके काय आहे प्रकरण
तिरुपतीच्या धर्तीवर तीस-तीस तास दर्शन रांगेत उभारणार्‍या विठ्ठल भक्तांना टोकन देऊन केवळ दोन तासात दर्शन घडावे, यासाठी गोपाळपूर परिसरात एक भव्य दर्शन मंडप उभारून तेथून थेट विठ्ठल मंदिरात स्काय वाक बांधण्याचा हा प्रकल्प आहे. विठ्ठल दर्शनाला येणार्‍या भाविकांना तिरुपतीप्रमाणे टोकन देऊन त्याांच्या वेळेनुसार या दर्शन मंडपातून त्यांना प्रवेश दिला जाणार आहे. यासाठी टीसीएस कंपनीने मोफत सॉफ्टवेअर विठ्ठल मंदिराला उपलब्ध करून दिले आहे.

आषाढी एकादशीला शुभारंभ
येत्या आषाढी एकादशीला याचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्याचा प्रयत्न मंदिर समिती करत असून यासाठी उभारण्यात येणारा दर्शन मंडप व स्काय वॉकसाठीचे हे टेंडर आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी 24 महिन्यांचा कालावधी असून सात एप्रिल रोजी या निविदा उघडण्यात येणार आहेत. यापूर्वी निघालेल्या निविदा जर रद्द झाल्या नसत्या तर आत्तापर्यंत ठेकेदार निश्‍चित करून कामालाही सुरुवात होऊ शकली असती. या प्रकरणावर आवाज उठवल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने तांत्रिक त्रूटी दाखवत पहिली निविदा रद्द केल्याचा खुलासा करण्याचा प्रयत्न केला होता. आता पुन्हा भाविकांसाठी विठुरायाचे दोन तासात दर्शन भविष्यात शक्य होणार आहे.

You Might Also Like

पंढरपूरातील चंद्रभागा नदीत बुडून एका तरुणाचा मृत्यू

राष्ट्रवाद आणि राष्ट्रीय सुरक्षेचे मुद्दे राजकीय पक्ष व हितसंबंधांच्या पलीकडील – उपराष्ट्रपती

सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी असलेल्या उजनी धरणात 50 टक्के पाणीसाठा

सोलापूर-दिल्ली विमानसेवा नोव्हेंबरपासून सुरू होणार

मोहोळ तालुक्‍यातील लांबोटी येथे पोलिसांच्या चकमकीत सराईत गुन्हेगार ठार

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article एटीएम मधून पैसे काढताना वृद्धास ‘असे’ गंडविले
Next Article गळफास घेऊन तरुणीची आत्महत्या पण नेमकी कुठे?

Latest News

ग्रुपने लालपरी बुक करा; कमी तिकिटात विठ्ठल दर्शनाला जा
महाराष्ट्र June 20, 2025
राहुल गांधींना मिळाला नवा सरकारी बंगला
महाराष्ट्र June 20, 2025
आदिवासी समाजाच्या गावात १७ प्रकारच्या योजना राबविणार – मुख्यमंत्री
महाराष्ट्र June 20, 2025
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते धरणगावात ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन
महाराष्ट्र June 20, 2025
अफगाणिस्तानच्या पश्चिम भागात ४.६ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप
महाराष्ट्र June 20, 2025
शासकीय अधिकाऱ्यांनी मनात अपेक्षा न ठेवता काम करावे – हसन मुश्रीफ
देश - विदेश June 20, 2025
पंढरपूरातील चंद्रभागा नदीत बुडून एका तरुणाचा मृत्यू
सोलापूर June 20, 2025
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आघाडीचा लवकरच निर्णय – शरद पवार
राजकारण June 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?