प्रतिनिधी सोलापूर:
जुळे सोलापुरात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या सोलापुर -बारावीत शिकणाऱ्या एका तरुणीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना जुळे सोलापुरातील ए.जी.पाटील नगरात शनिवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. अमृता शिवरुद्र शिंपी (वय १८ रा.ए.जी पाटीलनगर, जुळे सोलापूर) असे मयत झालेल्या तरुणीचे नाव आहे.
शनिवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घरात कुणी नसताना तिने घराच्या पहिल्या मजल्यावरील खोलीत छताच्या पंख्याला साडीच्या सहाय्याने गळफास घेतली होती. याची माहिती मिळाल्यानंतर नातेवाईकांनी तिला फासातून सोडवून शासकीय रुग्णालयात दाखल केले असता ती उपचारापूर्वी मयत झाली.
मयत अमृता शिंपी हिच्या पश्चात आई आणि एक मोठा भाऊ असा परिवार आहे. ती बारावी इयत्तेत शिकत होती. तिची आई शिक्षिका असून त्या शाळेत गेल्यानंतर तिने हा प्रकार केला.या घटनेची नोंद विजापूर नाका पोलिसात झाली असून या मागचे कारण समजले नाही पुढील तपास हवालदार अशोक गावडे करीत आहेत.