खास प्रतिनिधी
सोलापूर : अश्लील फोटो अन् तीन कोटी खंडणीच्या गुन्ह्यात तक्रारदार महिलेस अटक या प्रकरणांवरुन राज्यात चर्चेत आलेले ग्रामविकास तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी रविवार (ता.22) माळशिरस तालुक्यातील पिलीव इथल्या भाजप शाखेच्या उद्घाटनात सोहळ्यात तुफान शाब्दिक फटकेबाजी करत विरोधकांना जणू काही ओपन चॅलेंज देत ठणकावल्याचा मानलं जात आहे. ‘सावज टप्यात आलंय’ असा शब्दप्रयोग त्यांनी केल्याने हा त्यांचा इशारा ‘कही पे निगाहे कही पे निशाना’ असा समजला जात आहे. विशेषत्वे, गोरेंनी यावेळी काळ्या बाहुल्या अन् पूजा बांधण्याची खिल्ली उडविली.
दरम्यान ‘माझ्या पाठीशी देवाभाऊ असल्यानं माझं कुणीही वाकडं करु शकत नाही,
असं विरोधकांना नामदार गोरेंनी ठणकावत ओपन चॅलेंज दिल्यानं त्यांचे विरोधक सजग झाले असून त्यांची पुढची भूमिका महत्वाची राहणार असल्याचे राजकीय जाणकरांनी गोरेंच्या ‘त्या’ आव्हानात्मक वक्तव्यानंतर सांगितले. मंत्रि जयकुमार गोरे आणि विरोधी रामराजे निंबाळकर गट यांच्यामध्ये मागच्या अनेक दिवसांपासून प्रचंड घमासान सुरु आहे. एकमेकांना खपविण्याची एकही संधी सोडली जात नाही. इर्षा, द्वेष आणि मत्सर उभतांमध्ये अक्षरश: उफाळून आल्याचे दिसतंय. एकमेकांना पाण्यात पाहण्याचं, कट्टर राजकीय दुष्मनीचा अंक दोघांमध्ये सुरु आहे. याच टप्यावर महिलेस अश्लील फोटो प्रकरण उकरुन काढून मंत्रि गोरेंना चोहोबाजूंनी घेरण्याचा प्रकार झाला.
मात्र सत्तेत असल्यानं गोरेंनी भयंकर डावाचा तो अमिमन्यू भेदला. याच टप्यावर मंत्री गोरे काय बोलतात, याकडे केवळ सातारा जिल्ह्याचेच नव्हे, तर उभ्या महाराष्ट्राचं लक्ष लागू होतं. माळशिरस तालुक्यातील पिलीव इथल्या कार्यक्रमात त्यांनी सुसाट एक्स्प्रेस सुटली. यावेळी त्यांनी चौकार आणि षटकाराची विरोधकांच्या दिशेने तुफान फटकेबाजी करीत त्यांना जणू काही ओपन चॅलेंज दिले.
नदी किनारी पूजा अन् काळ्या बाहुल्या काय बांधता? गो म्हणाले, माझी एकही निवडणूक अशी गेली नाही, ज्यामध्ये माझ्या विरोधात केस झाली नाही. मला अडवण्यासाठी गावातले जिल्ह्यातले काही लोक सकाळ-सायंकाळ नदीच्या किनारी जाऊन पूजा बांधतात आणि काळ्या बाहुल्या बांधत आलेत. मात्र जोपर्यंत जनता आणि माता भगिनी माझ्यासोबत आहेत तोपर्यंत तुम्ही कितीही पूजा आणि बाहुल्या बांधल्या, तरी माझे कोणीही काहीही वाकडे करू शकत नाही’, असे जयकुमार गोरे यांनी ठणकावून सांगितले.
फोटो : रणजितसिंह नाईक निंबाळकर, राम सातपुते एकाच व्यासपीठावर त्रिदेव,
शेकडो कार्यकर्त्यांच्या गळ्यात भाजपचं उपरणं पिलीव इथल्या भाजप शाखा उद्घाटनाच्या निमित्ताने मंत्रि जयकुमार गोरे, माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर आणि माजी आमदार राम सातपुते हे अकलूजकर मोहिते-पाटील विरोधी त्रिदेव रविवारी एकाच व्यासपीठावर अलिकडच्या काळात पहिल्यांदाच आलेले दिसले. यावेळी तिघांनी जोरदार शाब्दिक फटकेबाजी केली. यावेळी शेकडो कार्यकर्त्यांच्या गळ्यात भाजपचं उपरणं घालून घेत या पक्षात प्रवेश केला. यानं मोहिते-पाटील गटात पोकळी निर्माण झाल्याचं मानलं गेलं.