प्रतिनिधी
करमाळा
करमाळा -पांडे (ता.करमाळा) येथे मंगळवारी पहाटे झालेल्या अपघात प्रकरणी करमाळ्याच्या पोलिसांनी रस्त्यावर बेकायदेशीरपणे थांबवलेला ट्रकचालक दिनकर महादेव बिराजदार (रा.बसवकल्याण जि.बिदर ) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. दिनांक 18 मार्च रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास करमाळा ते कुर्डूवाडी रोडवरील पांडे शिवारात रस्त्यावर थांबलेल्या केए५६-९२१६ या ट्रकला दुचाकी धडकल्याने शुभम रामा खाडे (रा.मिरगव्हाण) हा तरुण गंभीर जखमी होऊन उपचारादरम्यान मयत झाला होता.
ट्रक चालक दिनकर बिराजदार याने रस्त्याच्या मध्ये धोकादायक रित्या ट्रक उभा केल्याने अपघात घडून आपल्या मुलाच्या मृत्यूस कारणीभूत ठरला. अशी फिर्याद मयताचे वडील रामा खाडे यांनी करमाळा पोलिसात नुकतीच दाखल केली. त्याप्रमाणे पोलिसांनी ट्रक चालकावर गुन्हा दाखल केला. हवालदार गव्हाणे पुढील तपास करीत आहेत.