सोलापूर (प्रतिनिधी) थकित वीज बिलावरून कर्मचाऱ्यास मारहाण केल्याची घटना २२ मार्च रोजी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास मड्डी वस्ती येथे घडली. याप्रकरणी स्वप्निल बळीराम शेप (वय-३१,व्यवसाय तंत्रज्ञ महावितरण रुपा भवानी चौक,सोलापूर,राहणार जुनी मिल कंपाऊंड एमएससीबी कॉलनी) यांनी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.त्यांच्या फिर्यादीवरून राजू रामराम निंबाळकर यांचा मुलगा (रा.मड्डी वस्ती) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,फिर्यादी व फिर्यादी सोबत संतोष जाधव वरिष्ठ तंत्रज्ञ असे मिळून वरील ठिकाणी संशयित आरोपींच्या घरी वीज बिल भरा नाहीतर वीज खंडित करण्यात येईल.असे सांगण्यासाठी गेले असता त्यावेळी वरील संशयित आरोपी याने शिवीगाळ करत फिर्यादी यांच्या तोंडावर चापटा मारून तेथेच पडलेली वीट हातात घेऊन मारण्यासाठी अंगावर आला व फिर्यादी करत असलेल्या शासकीय कामात अडथळा निर्माण केला आहे. असे फिर्यादीत नमूद आहे.पुढील तपास पोसई.बामणे हे करीत आहेत.