सोलापूर : विविध प्रकारचे गंभीर गुन्हे करणाऱ्या सराई गुन्हेगारास सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे. पोलीस उपायुक्त (परिमंडळ) विजय कबाडे यांनी याबाबतचा आदेश दिला. भोलेनाथ उर्फ भोला बलभीम हावळे (वय 24, रा. हांडे प्लॉट, मुख्याध्यापक भवन समोर, जुना पुना नाका) असे तडीपार केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हावळे याच्याविरुद्ध सन 2020 व 2024 या कालावधीमध्ये गैर कायद्याची मंडळी जमा करून दंगा व मारामारी करणे, महिला अत्याचार तसेच अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हे करणे यासारखे गुन्हे दाखल असल्याने त्याच्याविरुद्ध जोडभावी पेठ पोलीस ठाणेकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियमन 1951 कलम 56 (१) (अ) (ब) अन्वयेचा तडीपार प्रस्ताव पोलीस उपायुक्त (परिमंडळ) यांना सादर करण्यात आला होता. त्यानुसार त्यांनी हावळे यास दोन वर्षासाठी तडीपार केले आहे. त्यास तडीपार केल्यानंतर ठाणे येथे सोडण्यात आले आहे.
—