Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: जयकुमार गोरेंच्या बदनामीत पवार कुटुंबियांचा हात- मुख्यमंत्री
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
राजकारण

जयकुमार गोरेंच्या बदनामीत पवार कुटुंबियांचा हात- मुख्यमंत्री

admin
Last updated: 2025/03/25 at 5:35 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

विधानसभेत केले सुप्रिया सुळे व रोहित पवारांवर थेट आरोप

मुंबई, 25 मार्च (हिं.स.) : फडणवीस सरकार मधले मंत्री जयकुमार गोरे यांच्या बदनामी प्रकरणात पवारांच्या पक्षाचा हात असल्याचे आढळले आणि त्या प्रकरणातले आरोपी थेट सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांच्या संपर्कात असल्याचे पुरावे सापडले, असा गौप्यस्फोट करणारा खुलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केला.

विधानसभेच्या पटलावर मुख्यमंत्र्यांनी हा खुलासा केल्यामुळे सुप्रिया सुळे आणि रोहित पवाराचा कायद्याच्या कचाट्यात अडकले. जयकुमार गोरे बदनामी प्रकरणाची सगळी चौकशी आणि तपास करून तड लावली जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. जयकुमार गोरे यांना एका महिलेने गंभीर आरोप करत अडचणीत आणले होते. जयकुमार गोरे यांनी आपले विवस्त्र फोटो आपल्याला पाठवून आपल्याला ब्लॅकमेल केले, असा आरोप एका महिलेने केला होता. त्यामुळे जयकुमार गोरे अडचणीत सापडले होते. पण पुढच्या काही दिवसांमध्येच संबंधित महिला खंडणी घेताना हा रंगेहात सापडली. त्यामुळे या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले. पोलिसांनी या सगळ्या प्रकरणाची कसून चौकशी आणि तपास केल्यानंतर वेगळेच सत्य समोर आले. हे सत्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुराव्यांसह विधानसभेत मांडले.

जयकुमार यांचे व्हिडिओ तयार करणारे आरोपी तुषार खरात अनिल सुभेदार आणि अन्य आरोपी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्यांच्या सतत संपर्कात होते त्यांचे शंभर कॉल आणि त्याचे रेकॉर्डिंग उपलब्ध झाले. ते प्रभाकर देशमुख यांच्या संपर्कात होते‌. आरोपींनी त्यांना व्हिडिओ पाठवले. प्रभाकर देशमुख यांची त्यांना उत्तरे आली. पण त्या पलीकडे जाऊन एक गंभीर बाब समोर आली, ती म्हणजे खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांच्या देखील हे आरोपी संपर्कात होते आरोपींनी या दोघांनाही संबंधित व्हिडिओ पाठवले होते त्यांचे त्यांच्याशी बोलणे झाले होते याचे सगळे पुरावे आता पोलिसांच्या हाती आले आहेत. या सगळ्या गंभीर प्रकरणाची चौकशी आणि तपास पुढे नेऊन त्याची तड लावू. पण त्याही पेक्षा गंभीर बाब म्हणजे असे कोणालाही सार्वजनिक जीवनातून उठवण्यासाठी अशा प्रकारची बदनामी करणे योग्य आहे का..? याचे आत्मपरीक्षण त्यांनी केले पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांच्या या गंभीर आरोपांमुळे सुप्रिया सुळे आणि रोहित पवार कायद्याच्या कचाट्यात अडकले. या सगळ्या प्रकरणाची चौकशी पुढे सुरू झाल्यावर त्यांना पोलिसांसमोर हजर राहावे लागण्याची शक्यता आहे.

You Might Also Like

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आघाडीचा लवकरच निर्णय – शरद पवार

विरोधकांनी आपल्या पॅनेलचे चेअरमन जाहीर करावेत – अजित पवार

बँक अध्यक्ष बच्चू कडूंची अपात्रता, हायकोर्टात 24 जूनला सुनावणी

सोलापुरात शरद पवारांना बसणार जोरदार धक्का ?

गेले त्यांचा विचार करू नका, पुन्हा कामाला लागा, शरद पवार

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ‘इंडि’ आघाडीने सोरोसचा पैसा निवडणुकीत वापरला- योगी आदित्यनाथ
Next Article भारतीय जैन संघटना “हे” करणार ! काय ठरलंय ?

Latest News

ग्रुपने लालपरी बुक करा; कमी तिकिटात विठ्ठल दर्शनाला जा
महाराष्ट्र June 20, 2025
राहुल गांधींना मिळाला नवा सरकारी बंगला
महाराष्ट्र June 20, 2025
आदिवासी समाजाच्या गावात १७ प्रकारच्या योजना राबविणार – मुख्यमंत्री
महाराष्ट्र June 20, 2025
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते धरणगावात ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन
महाराष्ट्र June 20, 2025
अफगाणिस्तानच्या पश्चिम भागात ४.६ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप
महाराष्ट्र June 20, 2025
शासकीय अधिकाऱ्यांनी मनात अपेक्षा न ठेवता काम करावे – हसन मुश्रीफ
देश - विदेश June 20, 2025
पंढरपूरातील चंद्रभागा नदीत बुडून एका तरुणाचा मृत्यू
सोलापूर June 20, 2025
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आघाडीचा लवकरच निर्णय – शरद पवार
राजकारण June 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?