सोलापूर/प्रतिनिधी
उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर काल मंगळवार २०२५ पासून सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ संचालक मंडलासाठी निवडणुक प्रक्रिया सुरू झाली आहे एकूण ४३१ अर्ज विक्री झाले असून त्यापैकी १८१ अर्ज विक्री यापूर्वीच झाली होती.कल मंगळवारी २५० अर्ज विक्री झाले आहे तर ११ उमेदवारी अर्ज सादर झाले असल्याची माहिती उपनिंबधक कार्यालयाच्या वतीने सांगितले आहे.तर सुरेश हसापुरे यांनी दोन गटातून , हमाल व तोलार – गफार चांदा व्यापारी मधून १ अर्ज असे एकूण ११ उमेदवारी आपला अर्ज नामनिर्देशन केलं आहे. येत्या शुक्रवारी २८ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशन करता येणार आहे.सण २०२५ च्या सोलापूर बाजार समिती निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांच्यावर जबाबदारी असणार असून शासनाच्या नियमानुसार निवडणूक प्रकिया सुरू आहे.
यापूर्वी सुरू झालेली निवडणूक प्रक्रिया शासनाने आहे त्या स्थितीत सथागिती दिली होती.अर्ज विक्रीचा पहिल्या दिवशी १८१ अर्ज विक्री झाले होते.काल मंगळवार पासून पुन्हा अर्ज विक्री आणि स्वीकृती सुरू झाली आहे. अर्ज दाखल करण्यासाठी फक्त चार दिवसांची मुदत राहणार आहे. यंदाच्या निवडणुकीसाठी ५ हजार ४३१ जणांना मतदानासाठी पात्र ठरविण्यात आले आहे. दाखल होणाऱ्या अर्जाची छाननी २ एप्रिल रोजी सकाळी ११.३० वाजल्यापासून सुरू होणार आहे. उमेदवारी अर्ज माघारीसाठी १६ एप्रिल मुदत आहे. निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांची यादी व निवडणूक चिन्हांचे वाटप १७ एप्रिलला होणार आहे. बाजार समितीसाठी २७ एप्रिल रोजी मतदान व २८ एप्रिल रोजी मतमोजणी होणार आहे.
मतदारसंघ-मतदार संख्या
*सहकारी संस्था-१,८९५
*ग्रामपंचायत-१,१७६
*व्यापारी-१,२७६
*हमाल-तोलार-१,०८४
* -असा असेल परिपूर्ण अर्ज -घोषणापत्र, सूचक, अनुमोदक यांच्या सहीसह आधार कार्ड, रहिवास पुरावा, शेतकरी दाखला व सातबारा उतारा, वय २१ पूर्ण असणे आवश्यक, राखीव जागेसाठी जातीचा दाखला, हमाल, तोलारासाठी बाजार समितीचा बेबाकी दाखला, अनामत रक्कम पावती, पासपोर्ट फोटो.
* – सहकार व पणन विभागाने ठरवून दिलेल्या नियोजन प्रमाणे निवडणूक प्रकिया सुरू झाली आहे.उमेदवाराची गैरसोय किंवा चुकीचा अर्ज दाखल होऊ नये म्हणून तपासणी करून स्वीकृती केली जात आहे.सर्व साधारण उमेदवारासाठी ५००० तर राखीव साठी १०००हजार रुपये अनामत रक्कम आहे २०० रुपये अर्ज फी असणार आहे.उपनिंबधक किरण गायकवाड