Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: ‘या’ तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, ‘या’ बंधार्‍यांमध्ये सुटणार पाणी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

‘या’ तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, ‘या’ बंधार्‍यांमध्ये सुटणार पाणी

admin
Last updated: 2025/03/26 at 12:17 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

सांगोला प्रतिनिधी
तालुक्यातील रब्बी हंगामातील पिकांना जीवदान देण्यासाठी तसेच पाणी टंचाई दूर करण्यासाठी येत्या १० एप्रिल पासून टेंभू, म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरू करून माण व कोरडा नदीवरील बंधारे भरून देण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी दिली. मंत्रालयात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या दालनात झालेल्या बैठकीत सांगोला तालुक्यातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी तात्काळ टेंभू व म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

मंत्रालयात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या दालनात जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांची पश्चिम महाराष्ट्रातील आमदारांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी खासदार रणजीतसिंह निंबाळकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांच्यासह अधिकारी व आमदार उपस्थित होते. सध्या सांगोला तालुक्‍यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून विहिरी व कूपनलिकांची पाणी पातळी खालावली आहे. नदी, तलाव,बंधारे ओढे, नाले कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे शेतकरी चांगलेच धास्तावले आहेत. पाणी प्रश्न मार्गी लावण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली जात आहे.

त्यामुळे या बैठकीत सांगोला तालुक्यातील भीषण पाणी टंचाईवर चर्चा करण्यात आली. येत्या १० एप्रिल पासून सांगोला तालुक्यासाठी टेंभू व म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. टेंभू योजनेतून जुनोनी व बुद्धेहाळ तलाव भरून माण नदीत सोडून बलवडी ते मेथवडे पर्यंतचे सर्व बंधारे पूर्ण क्षमतेने भरून देण्यात येणार आहेत. तसेच म्हैसाळ योजनेतून घेरडी तलाव भरून कोरडा नदीवरील सर्व बंधारे भरून देण्यात येणार असल्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी सांगितले.

टेंभू व म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरू होणार असल्याने सांगोल्यातील जनतेला, शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असल्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी सांगितले. टेंभूचे पाणी माण नदीत सोडण्यात येणार असल्याने बलवडी, वझरे, नाझरे, चिणके, अनकढाळ, वाटंबरे, कमलापूर, वासुद, अकोला, कडलास, वाढेगाव, बामणी, सावे, मांजरी, देवळे, मेथवडे या गावांसह अन्य १५ ते २० गावांना फायदा होणार असून या पाण्यामुळे सिंचनाचा प्रश्न सुटणार आहे. टेंभूच्या आवर्तनाचे पाणी सर्व गावांना व्यवस्थित देऊन माण नदीवरील सर्व बंधारे भरण्याचे योग्य नियोजन करून पाणी सोडण्याच्या सूचना टेंभूच्या अधिकाऱ्यांना दिल्या असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी दिली.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संसदेत ताई आक्रमक, माईक बंद केला
Next Article सोलापूर नागरी औद्योगिक बँकेसाठी एकरकमी परतफेड योजना लागू करण्याचे सहकार मंत्र्यांचे आश्वासन

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?