Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: बाॅल झेलता झेलता थेट विहिरीत गेला, पुढं घडलं ते लय वाईट!
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

बाॅल झेलता झेलता थेट विहिरीत गेला, पुढं घडलं ते लय वाईट!

admin
Last updated: 2025/03/27 at 11:51 AM
admin
Share
5 Min Read
He died tragically by drowning in a well.
SHARE

ओंकार विहिरीत पडल्याचे कळताच आई-वडिलांनी हंबरडा फोडला;
मित्राचा ‘कॅच आऊट’ घेता घेता आयुष्याचीच विकेट घालवून बसला!

: दहावी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचा कंदलगावात विहिरीत बुडून मृत्यू
: ह्दयद्रावक घटनेने पंचक्रोशी अक्षरश: हळहळली
: मंगळवारपासून क्रिकेटचे ‘ते’ मैदान सुनसुने झाले
: लाडका क्रिकेट यार कायमचा सोडून गेल्याने इतर मित्र शोकसागरात

खास प्रतिनिधी
सोलापूर : गावातील क्रिकेटच्या मैदानावर क्रिकेट खेळताना कॅच आऊट घेता घेता तो सरळ विहिरीत पडला. त्याला पोहता येत नसल्याने त्याचा विहिरीत बुडून दुर्देवी मृत्यू झाला. पोटचा गोळा विहिरीत पडल्याचे मित्रांनी जेव्हा मृत ओंकारच्या घरी जाऊन त्याच्या आई-वडिलांना सांगितले. तेव्हा आईला हंबरडा फुटला, ती जमिनीवर कोसळली. वडिलांची बोबडी वळली. त्यांना काहीच सुचेना ते खाली बसले. दहावीची परीक्षा देऊन आलेला ओंकार सुट्टी लागल्याच्या आनंदात मनसोक्त क्रिकेट खेळत होता, याच टप्यावर नियतीला त्याचे हे मनसोक्त खेळणे आणि आयुष्य जगणे जणू मान्य नसावे. क्रिकेट खेळताना चेंडूचा झेल घेऊन मित्राला आऊट करुन आनंद मिळविण्याच्या नादात असलेल्या ओंकावर जणू काळाने झडप घातली. मित्राचा कॅच आऊट घेता घेता त्याची स्वत:चीच आयुष्याची कायमची विकेट तो घालवून बसला.

विशेषत्वे, ओंकार याच्या दुर्दैवी मृत्यूमुळे त्याच्या क्रिकेट यार मित्रांमध्ये सन्नाटा पसला. मंगळवारी (ता.25) त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार होताना त्याच्या सर्व मित्रांच्या डोळ्याच्या कडा पाणवल्या. कंदलगावसह पंचक्रोशीत त्याच्या कायमच्या जाण्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. ज्या क्रिकेटच्या मैदानावर तो क्रिकेट खेळायचा ते मैदान मंगळवारपासून अक्षरश: सुने सुने झाले. ओंकारच्या कायमच्या सोडून जाण्याने त्याचे कुंटुंबिय आणि मित्र परिवार शोकसागरात बुडाला आहे.

ओंकार संजय चव्हाण (वय 16) हा विजापूर रस्त्यावरील एका आश्रम शाळेत शिकत होता. दहावीची परीक्षा संपल्याने तो गावी कंदलगावला आपल्या घरी आला होता. आई-वडिलांना शेतीपयोगी साधने बनवण्याच्या कामात मदत करुन उरलेल्या वेळेत मनसोक्त क्रिकेट खेळण्याचा प्लॅन त्याने सुट्टीचा केला होता. त्यानुसार, सोमवार (ता.24) संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास ओंकार मित्रांसोबत क्रिकेट खेळण्यासाठी गेला होता. विहिरीच्या कडेला मित्राचा कॅच आऊट घेताना तो पाय घसरून खोल असलेल्या विहिरीत पडला. ओंकार विहिरीत पडल्याचे कळताच त्याच्या मित्रांनी गलका केला. ओंकारच्या आई-वडिलांसह कंदलगावच्या ग्रामस्थांना मित्रांनी तो विहिरीत पडल्याची माहिती दिली. मात्र रात्र झाल्याने ओंकारला विहिरीतून काढण्यात अडचणी आल्या. या घटनेचा तपास मंद्रूप पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार विक्रम माने, हे करीत आहेत.

ओंकारच्या आयुष्याची दोरीच तुटली होती. त्यामुळे प्रयत्न असफल क्रिकेट खेळताना मुलगा विहिरीत पडल्याची माहिती गावकर्‍यांना मिळताच गावकर्‍यांनी विहिरीकडे धाव घेतली. सोमवारी संध्याकाळपासून रात्री उशिरापर्यंत शोध कार्य सुरु होते. विहिरीत पडलेला ओंकार सापडत नसल्याने आणि विहीर खोल असल्याने तत्काळ मंद्रूप पोलीस ठाणे येथे या घटनेची माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच मंद्रूप पोलीस तातडीने घटनास्थळी आले. पोलीस आणि गावकर्‍यांनी तत्काळ मनगोळी येथील भूई कमलाकर डिरे, अनिल सले, अजय नगरे, हर्षद कांबळे, फारुख नदाफ यांच्या मदतीने रात्री उशिरा मृत ओंकारचा शोध घेऊन त्याला बाहेर काढले. मात्र शोध कार्य करण्यास उशीरा लागला तोपर्यंत ओंकारचा मृत्यू झाला होता. त्याच्या आयुष्याचीच दोरी तुटली होती. त्यामुळे ग्रामस्थ आणि मंद्रुप पोलिसांचे त्याला वाचविण्याचे प्रयत्न असफल ठरले.

अत्यंसंस्कारावेळी सर्वांनाच आला हुंदका
मृतदेह शवविच्छेदनासाठी मंद्रूप येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला होता. शवविच्छेदन करून ओंकारचा मृतदेह मंगळवारी कुटुंबीयांना सुपूर्द करण्यात आला. अत्यंसंस्कारासाठी ओंकराच मृतदेह सरणावर ठेवला गेला तेव्हा उपस्थित सर्वांनाच हुंदका आला. ऐन तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या ओंकारच्या आयुष्याचा सगळाच खेळ खल्लास झाला होता.दहावीत शिक्षण घेणार्‍या ओंकारचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ओंकारच्या अशा जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

आई-वडिलांसह दोघा भावांचे अश्रू थांबता थांबेनात
घरातील हुशार ओंकार कायमचा सोडून गेल्याने त्याच्या कुंटुंबातील आई-वडिल तसेच त्याचे दोघे भाऊ शोकसागरात बुडाले आहेत. ओंकारचे दु:ख पचविणे खूप अवघड चालले आहे. त्यांच्या डोळ्यातील आश्रू थांबता थांबेनात.
ओंकारच्या अकाली एक्झिट घटनेचे काही हायलाईट्स …
– शेतीपयोगी साधने बनविणारा घिसाडी चव्हाण परिवार हा
मागच्या 7-8 वर्षांपासून कंदलगावात आहे वास्तव्यास
– मृत ओंकार हा चव्हाण परिवारातील दोन नंबरचा मुलगा होता,
त्याला आणखे आहेत दोघे सख्खे भाऊ
– कंदलगावसह शेजारच्या गावांमध्ये शेतीपयोगी साधने विकून चव्हाण परिवाराची गुजराण आहे सुरु
– ओंकारने शिकावे, नोकरी करावी, त्याच्या नशिबी घिसाडी काम येऊ नये ही होती त्याच्या

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापुराच्या ‘एनटीपीसी’ वीज 6209 मिलियन युनिट्स वीजनिर्मिती, फायदा काय अन् कोणाला ?
Next Article सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती काहीही करा ‘ही’ बाजार समिती ताब्यात घ्या, कोणी, कोणाला सोडले फर्मान ?

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?