Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: उजनीच्या आंदोलनाचं पाणी उफाळले, ‘हे’ देणार धरणग्रस्तांसाठी व्यापक लढा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

उजनीच्या आंदोलनाचं पाणी उफाळले, ‘हे’ देणार धरणग्रस्तांसाठी व्यापक लढा

admin
Last updated: 2025/03/27 at 11:55 AM
admin
Share
4 Min Read
SHARE

सोलापूर-प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यातील उजनीसह अन्य धरणग्रस्तांच्या मागण्यांची पूर्तता होण्यासाठी उजनीसह आता राज्यातील सर्वच विस्थापित झालेल्या धरणग्रस्तांच्या प्रश्‍नासाठी व्यापक लढा उभा करावा लागेल,असे सूतोवाच नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी केले.अखिल भारतीय समाजवादी शिक्षण हक्क सभेचे अकरावे द्वैवार्षिक अधिवेशन ‘आपलं घर’ नळदुर्ग येथे संपन्न झाले. या अधिवेशनास उद्घाटक म्हणून नर्मदा बचाव आंदोलनातील नेत्याा मेधा पाटकर उपस्थित होत्याा. यावेळी इंदापूरचे धरणग्रस्तांचे नेते प्रा.कृषा ताटे उपस्थित होते.याप्रसंगी श्री. ताटे यांनी पाटकर यांच्याशी उजनी धरणग्रस्तांच्या प्रश्‍नाबाबत संवाद साधला त्याावेळी त्याा म्हणाल्या, “विकासाच्या नावाखाली सरकार आदिवासींना विस्थापित करीत आहे.

त्याांचा रोजगार हिरावून घेतला जातोय. हे एकीकडे असतानाच राज्य सरकार शिक्षणातून अंग काढून घेऊ पाहते. आदिवासी, महिला, मुले यांच्या मूलभूत हक्कांसाठी आपल्याला संघर्ष करावा लागेल. तसेच राज्यामध्ये धरणग्रस्तांचेही प्रश्‍न मोठ्या प्रमाणात प्रलंबित आहेत .राष्ट्र विकासासाठी धरणग्रस्तांनी आपली घरेदारे, जमिनी संपादनासाठी दिल्या. धरणग्रस्तांचे पुनर्वसन नीट झाले नाही. अजूनही अनेक प्रश्‍न प्रलंबित आहेत. त्याासाठी आता उजनी धरणासह राज्यातील सर्वच धरणग्रस्तांच्या प्रश्‍नासाठी व्यापक लढा उभा करण्यासाठी लवकरच मी इंदापूर येथे येत आहे. उजनी धरणग्रस्तांच्या प्रश्‍नांचा आढावा घेऊन, त्याा ठिकाणी उजनी धरणग्रस्तांचे म्हणणे ऐकून घेऊन, आपण लवकरच या लढ्याला मुर्तरूप देऊ. असे त्याांनी सुतोवाच केले. या प्रसंगी श्री. ताटे यांनी उजनी धरणग्रस्तांचे प्रश्‍न त्याांच्या निदर्शनास आणून दिले.

उजनी धरणग्रस्तांचे पुनर्वसन 1976-77ते 1978-79 दरम्यान झाले. पुणे, सोलापूर ,अहिल्यानगर या तीन जिल्ह्यातील भीमा नदीच्या काठच्या गावातील लोकांचे पुनर्वसन करण्यात आले. या धरणामध्ये अनेक गावी गेली. पुनर्वसनाला वेळ कमी मिळाला. घाईगडबडीत पुनर्वसन झाले. अनेक गावांना मूलभूत सुविधा मिळाल्या नाहीत. अजूनही अनेक गावांमध्ये स्मशानभूमी नाही. उजनी धरणग्रस्तांची मरणानंतरही ‘परवड’ सुरू आहे. उजनी धरणग्रस्तांच्या मुलांना शासकीय नोकरीत आरक्षणासाठी प्रकल्पग्रस्ताचे दाखले दिले गेले. मात्र्ा असे दाखले मिळूनही अनेक धरणग्रस्तांची मुले शासकीय सेवेपासून आजही वंचित आहेत. त्यााचा अनुशेष भरून काढला गेला नाही. उजनी धरणग्रस्तांना पर्यायी जमिनी सोलापूर जिल्ह्यात दिल्या गेल्या. पुनर्वसन त्याांच्याच गावाजवळ करण्यात आले. ज्या धरणग्रस्तांनी सोलापूर जिल्ह्यात पर्यायी जमिनी घेतल्या. तेथील लोकांनी दहशत बसवून त्याा कसून न दिल्यामुळे भीतीपोटी अनेक धरणग्रस्त ,वाटेल त्याा किमतीने जमिनी विकून गावी आले.

काही धरणग्रस्त सोलापूर जिल्ह्यात मृत्युामुखी पडले.अजूनही अनेक धरणग्रस्तांना पंचेचाळीस वर्षानंतरही पर्यायी जमीनी मिळाल्या नाहीत .धरणग्रस्तांच्या जमिनी बळकावणारी एक मोठी टोळी सोलापूर जिल्ह्यात कार्यरत असल्याचा धरणग्रस्तांना संशय असून, या टोळीतील सदस्य काही एजंटांना घेऊन धरग्रस्तांना शोधत त्याांच्या गावी येतात. त्याांना आमिष दाखवतात. त्याांच्याकडून कागदपत्र्ा घेतात. त्याांच्या नावावर जमिनी मिळविल्या जातात. थोडेफार पैसे देऊन मोठ्या किंमतीने ही टोळी या जमिनीचे हस्तांतरण करते. मागील काळामध्ये अशाच लोकांच्या कडून आलेली प्रकरणे मंजूर होत होती. धरणग्रस्त त्याा ठिकाणी कागदपत्र्ेा घेऊन गेला तर, त्याला ‘ताकास तूर’ लावून दिली जात नाही. आणि पुनर्वसन कार्यालयात हेलपटे मारावे लागतात. कागदपत्र्ाांची पूर्तता करता- करता धरणग्रस्तांचा जीव मेटाकोटीला येतो. यामुळे धरणग्रस्त, जमीनी मिळवण्याचे प्रयत सोडून देतात. व आणायासे एजंटांच्या गळ्याला लागतात.

ते आजही उपराच राहिले उजनी धरणामध्ये जमिनी गेल्यानंतर उजनी धरणग्रस्तांना नाममात्र्ा पैशाचा मोबदला दिला गेला. काही धरणग्रस्त न्याय मागण्यासाठी न्यायालयात गेले. कमी पैसे मिळाले म्हणून ,त्याांनी दावे दाखल केले. ज्यांनी दावे दाखल केले .त्याांना नुकसान भरपाई न्यायालयाच्या आदेशाने मिळाली. जे धरणग्रस्त न्यायालयात दावा दाखल करू शकले नाहीत. तो धरणग्रस्त आजही ‘उपरा’ च राहिला आहे. वास्तविक पाहता, ज्यांच्या जमिनी गेल्या .किती जमिनीचे संपादन झाले. त्याा जमिनीची प्रत कोणती होती .याची सर्व इत्यांभूत माहिती शासनाकडे असताना सुद्धा पर्यायी जमीनी मिळवताना शासन दरबारी अनेक वेळा, अनेक कागदपत्र्ाांची पूर्तता करावी लागते .

आता सध्या तर पर्याय जमिनीची प्रकरणे बंदच करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. पंचेचाळीस वर्षांपूर्वी पुनर्वसित गावठाणात बांधण्यात आलेल्या जिल्हा परिषदेच्या अनेक शाळा सध्या मोडकळीला आलेल्या आहेत. अशा तत्कालीन जुनाट शाळांमध्ये धरणग्रस्तांची मुले जीव मुठीत धरून शिक्षण घेत आहेत. अशा अनेक प्रलंबित प्रश्‍नांची मालिकाच उजनी धरणाच्या पुनर्वसित भागात फेरफटका मारला असता दिसून येत आहे.-

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती काहीही करा ‘ही’ बाजार समिती ताब्यात घ्या, कोणी, कोणाला सोडले फर्मान ?
Next Article ‘या’ जिल्ह्यातील ६ हजार लाडक्या बहिणींच्या कर्जांचे पोस्टमार्टम , कोण ठरणार अपाञ ?

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?