Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे सूप वाजले, 30 जूनपासून पावसाळी अधिवेशन
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे सूप वाजले, 30 जूनपासून पावसाळी अधिवेशन

admin
Last updated: 2025/03/27 at 2:56 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

मुंबई, 27 मार्च (हिं.स.) : विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन राष्ट्रगीताने संस्थगित करण्यात आले. पुढील अधिवेशन दि. 30 जून रोजी विधानभवन, मुंबई येथे होणार असल्याची घोषणा विधान परिषदेत सभापती प्रा. राम शिंदे यांनी तर अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी विधानसभेत केली.

विधानसभेत प्रत्यक्षात 146 तास कामकाज विधानसभेत प्रत्यक्षात 146 तास कामकाज झाले. रोजचे सरासरी कामकाज 9 तास 7 मिनिटे झाले. या अधिवेशनात विधानसभेत सदस्यांची जास्तीत जास्त उपस्थिती 91.84 टक्के होती, तर एकूण सरासरी उपस्थिती ही 83.55 टक्के इतकी होती. विधानसभेत पुर्न:स्थापित 9 शासकीय विधेयके मांडण्यात आली त्यापैकी 9 विधेयके संमत झाली. तसेच सभागृहात नियम 293 अन्वये एकूण प्राप्त सूचना 5 असून 5 सूचना मान्य करण्यात आल्या. मान्य केलेल्या सूचनांवर चर्चा झाली. या अधिवेशनात सहकार्य केल्याबद्दल अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी सर्वांचे आभार मानले.

या अधिवेशनात “जागतिक महिला दिन” आणि “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिजन्मशताब्दी वर्षानिमित्त” मांडण्यात आलेल्या प्रस्तावावर चर्चा झाली. तसेच भारतीय गणराज्याच्या 75 व्या वर्षानिमित्त “भारताच्या संविधानाची गौरवशाली अमृत महोत्सवी वाटचाल” या विषयावर चर्चा घेण्यात आली.
विधान परिषदेत एकूण ११५ तास ३६ मिनिटांचे कामकाज

विधान परिषदेत एकूण ११५ तास ३६ मिनिटांचे कामकाज झाले असून रोजचे सरासरी कामकाज ७ तास १३ मिनिटे झाल्याची माहिती सभापती प्रा.शिंदे यांनी दिली. अधिवेशनात सदस्यांची जास्तीत जास्त उपस्थिती ९१.६७ टक्के तर सरासरी उपस्थिती ८३.६५ टक्के होती. विधान परिषदेत तीन शासकीय विधेयके पुर:स्थापित करण्यात येऊन तीन विधेयके संमत करण्यात आली. तर चार विधानसभा विधेयके पारित करण्यात आली. विधानसभेकडे एकूण पाच धन विधेयके शिफारशी शिवाय परत पाठविण्यात आली.

विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात जास्तीत जास्त प्रश्नांना न्याय मिळणे आवश्यक आहे, अशी भूमिका सभापती प्रा. शिंदे यांनी मांडली होती. त्यानुसार या अधिवेशनात प्रश्नोत्तराच्या तासांमध्ये पुकारण्यात आलेल्या आजवरच्या प्रश्नांच्या सरासरीपेक्षा जास्त संख्येने प्रश्न चर्चेला घेण्यात आल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. या अधिवेशनात ‘जागतिक महिला दिन’ आणि ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिजन्मशताब्दी वर्षानिमित्त’ मांडण्यात आलेल्या प्रस्तावावर चर्चा झाली. तसेच भारतीय गणराज्याच्या ७५ व्या वर्षानिमित्त ‘भारताच्या संविधानाची गौरवशाली अमृत महोत्सवी वाटचाल’ या विषयावर चर्चा घेण्यात आली.

You Might Also Like

नाशिकमधील उबाठा गटाच्या चार माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

भारतीयांनी तेहरान सोडून सुरक्षित ठिकाणी जावे

आषाढी एकादशीच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी महापूजेचे मुख्यमंत्र्यांना निमंत्रण

शिक्षकांना कॅशलेस मेडिक्लेम योजना लागू करण्याची मागणी

प्रभाग रचनेत राजकीय हस्तक्षेप होऊ देणार नाही : पुणे मनपा आयुक्त

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article उष्माघाताचा त्रास होऊ नये म्हणून खबरदारी घेण्याचे नमुंमपाचे आवाहन
Next Article विधिमंडळात १२ महत्त्वाचे कायदे मंजूर; अर्थसंकल्पावर सकारात्मक चर्चा – मुख्यमंत्री

Latest News

नाशिकमधील उबाठा गटाच्या चार माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश
महाराष्ट्र June 17, 2025
भारतीयांनी तेहरान सोडून सुरक्षित ठिकाणी जावे
महाराष्ट्र June 17, 2025
कर्नाटक हायकोर्टाची आरसीबी, केएससीएला नोटीस
देश - विदेश June 17, 2025
आषाढी एकादशीच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी महापूजेचे मुख्यमंत्र्यांना निमंत्रण
महाराष्ट्र June 17, 2025
शिक्षकांना कॅशलेस मेडिक्लेम योजना लागू करण्याची मागणी
महाराष्ट्र June 17, 2025
कोलकाता : एअर इंडियाच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग
देश - विदेश June 17, 2025
राष्ट्रवाद आणि राष्ट्रीय सुरक्षेचे मुद्दे राजकीय पक्ष व हितसंबंधांच्या पलीकडील – उपराष्ट्रपती
सोलापूर June 17, 2025
सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी असलेल्या उजनी धरणात 50 टक्के पाणीसाठा
सोलापूर June 17, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?