सोलापूर बाजार समिती,१४७ नामनिर्देशन,१६२ अर्ज विक्री
उत्तर व दक्षिण मधील नेत्यांचे अर्ज सादर
सोलापूर/प्रतिनिधी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक साठी उत्तर दक्षिण सह सोलापूर शहर व अक्कलकोट मधील सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे आजी माजी चेअरमन, सदस्य,विविध राजकीय पक्षचे नेत्यांनी आज उमेदवारी सादर केली आहे.सोलापूर बाजर समिती निवडणूक मध्ये तीन दिवसात ७८७ अर्ज विक्री झाली असून २०९ इच्छुक उमेदवाराणी अर्ज सादर केलं आहे.
आज तिसऱ्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट तथा जिल्हा अध्यक्ष बळीराम साठे,सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी व्हाईस चेअरमन श्रीशैल नारोळे,माजी सभापती इंदुमती पाटील,सिद्धेश्वर साखर कारखान्याचे माजी संचालक भारत जाधव,उत्तर तालुका काँग्रेसचे शालिवाहन माने,सचिन गुंड यांच्यसह उत्तर दक्षिण अक्कलकोट मधील ग्रामपंचायत, हमाल तोलार शेतकरी पदासाठी उमेदवारी अर्ज सादर केलं आहे.आज उमेदवारी सादर करण्यासाठी ११ ते ३ पर्यंत वेळ आहे.