Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सैन्याला मिळणार 156 अत्याधुनिक हेलिकॉप्टर्स
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

सैन्याला मिळणार 156 अत्याधुनिक हेलिकॉप्टर्स

admin
Last updated: 2025/03/29 at 3:34 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

संरक्षण मंत्रालयाचे एचएएलशी कोट्यवधींचे 2 करार

नवी दिल्ली, 29 मार्च (हिं.स.) : भारतीय संरक्षण मंत्रालयाने हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडशी (एचएएल) 62 हजार 700 कोटी रुपयांचे 2 करार केले आहे. त्यानुसार एचएएल भारतीय सैन्याला 156 अत्याधुनिक लढाऊ हेलिकॉप्टर्स पुरवणार आहे.

यापैकी पहिला करार भारतीय हवाई दलाला 66 हलक्या लढाऊ हेलिकॉप्टरच्या पुरवठ्यासाठी आहे आणि दुसरा करार भारतीय लष्कराला 90 हलक्या लढाऊ हेलिकॉप्टरच्या पुरवठ्यासाठी आहे. या हेलिकॉप्टरचा पुरवठा कराराच्या तिसऱ्या वर्षापासून सुरू होईल आणि पुढील 5 वर्षांत पूर्ण होईल. एलसीएच हे भारतातील पहिले स्वदेशी डिझाइन केलेले आणि विकसित केलेले लढाऊ हेलिकॉप्टर आहे. हे हेलिकॉप्टर 5 हजार मीटरपेक्षा जास्त उंचीवर कार्य करण्यास सक्षम आहे. या हेलिकॉप्टरचे बहुतेक घटक भारतात डिझाइन आणि उत्पादित केले गेले आहेत आणि या खरेदी प्रक्रियेद्वारे हेलिकॉप्टर एकूण 65 टक्क्यांहून अधिक स्वदेशी घटक प्राप्त करण्याचे नियोजन आहे. यामध्ये 250 हून अधिक देशांतर्गत कंपन्या सहभागी होतील, ज्यापैकी बहुतेक एमएसएमई असतील आणि 8500 हून अधिक प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष नोकऱ्या निर्माण करतील. दरम्यान, भारतीय हवाई दल आणि भारतीय नौदलाच्या वैमानिकांना हवेतून हवेत इंधन भरण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी मंत्रालयाने फ्लाइट रिफ्युएलिंग एअरक्राफ्टच्या (एफआरए) वेट लीजसाठी मेट्रिया मॅनेजमेंटसोबत करार केला.

मेट्रिया 6 महिन्यांत एफआरए (केसी135 विमान) देईल, जे भारतीय हवाई दलाने भाडेतत्त्वावर घेतलेले पहिले एफआरए असेल. या तीन करारांवर स्वाक्षऱ्या झाल्यामुळे, 2024-25 मध्ये संरक्षण मंत्रालयाने स्वाक्षरी केलेल्या एकूण करारांची संख्या 193 वर पोहोचली आहे, ज्यांचे एकूण करार मूल्य 2,09. 050 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे, जे आतापर्यंतचे सर्वाधिक आणि मागील सर्वोच्च आकड्याच्या जवळजवळ दुप्पट आहे. यापैकी 92 टक्के कंत्राटे देशांतर्गत उद्योगांना देण्यात आली होती, ज्यांचे कंत्राट मूल्य 1, 68.922 कोटी रुपये होते. संरक्षण मंत्रालयाने नाग मिसाइल सिस्टमच्या (एनएएमआयएस) ट्रॅक्ड आवृत्तीच्या खरेदीसाठी सार्वजनिक क्षेत्रातील आर्मर्ड व्हेईकल्स निगम लिमिटेडसोबत करार केला. अँटी-टँक वेपन प्लॅटफॉर्म आणि फोर्स मोटर्स लिमिटेड आणि महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडसोबत सशस्त्र दलांसाठी सुमारे 5 हजार हलक्या वाहनांसाठी आणखी एक करार केला, ज्याची एकूण किंमत सुमारे 2500 कोटी रुपये आहे.

You Might Also Like

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

चीनला मागे टाकत हवाई दलाच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान खटल्याला ऍटर्नी जनरल यांची मंजुरी

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article तुळापूरप्रमाणेच वढू बुद्रुक इथंही भव्य स्मारक साकारण्यात येणार – अजित पवार
Next Article कुणाल कामराच्या विरोधात 3 गुन्हे दाखल

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?