Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: कुणाल कामराच्या विरोधात 3 गुन्हे दाखल
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

कुणाल कामराच्या विरोधात 3 गुन्हे दाखल

admin
Last updated: 2025/03/29 at 3:37 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

मुंबई, 29 मार्च (हिं.स.) : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह विडंबनात्मक गाण्यासाठी कुणाल कामरा याच्याविरोधात मुंबईतील खार पोलीस ठाण्यात 3 वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत.

मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार, जळगाव शहराच्या महापौरांनी एक तक्रार दाखल केली असून, नाशिकमधील एका हॉटेल व्यावसायिक आणि एका उद्योजकाने अन्य 2 तक्रारी नोंदवल्या आहेत. खार पोलिसांनी कामरा याला 2 वेळा चौकशीसाठी बोलावले, मात्र त्याने हजेरी लावलेली नाही.

यापूर्वी, मद्रास उच्च न्यायालयाने कामरा याला विविध एफआयआरच्या संदर्भात 7 एप्रिल 2025 पर्यंत अटकेपासून अंतरिम संरक्षण दिले आहे. कामरा याने तात्पुरती जामीन मिळावा म्हणून न्यायालयात धाव घेतली होती, कारण त्यांच्या विडंबनात्मक गाण्यानंतर त्याला धमक्या मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबई पोलिसांनी त्याला 31 मार्च रोजी खार पोलीस ठाण्यात चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. त्याला बजावण्यात आलेले हे तिसरे समन्स आहे, यापूर्वी शिवसेना आमदार मुरजी पटेल यांनी दिलेल्या तक्रारीवरून त्याला 2 वेळा चौकशीसाठी बोलावले होते, मात्र तो हजर राहिला नाही. दरम्यान, माध्यमांवर टीका करताना कामरा याने त्यांना सत्ताधारी पक्षाचे ‘प्रचार यंत्रणा’ असल्याचा आरोप केला.

“मुख्य प्रवाहातील मीडिया सध्या सत्ताधारी पक्षाची फक्त गैरसमज पसरवणारी शाखा आहे. ते अशा गोष्टींवर बातम्या देतात ज्या जनतेच्या जीवनाशी संबंधित नसतात. जर त्यांनी उद्यापासून कायमचे आपले दुकान बंद केले, तर ते देश, जनता आणि त्यांच्या स्वतःच्या मुलांसाठीही चांगले ठरेल,” अशी पोस्ट कामरा याने ‘एक्स’ वर केली आहे. त्याने त्याच्या विडंबनात्मक गाण्यात “गद्दार” शब्दाचे उल्लेख केल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. अनेक नेत्यांनी त्याच्या या कृतीचा निषेध केला असून, त्यांच्या विरोधात कारवाईची मागणी केली आहे. या वादानंतर एकनाथ शिंदे यांच्या युवा सेनेने ‘हॅबिटॅट’ या विनोद मंचावर तोडफोड केली, जिथे कामराने हा शो केला होता. भाजप-प्रणीत केंद्र सरकारविरोधात टीका करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या कामरा याने मात्र माफी मागण्यास नकार दिला आहे.

You Might Also Like

संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ

आंध्रप्रदेश : गजरला रवीसह 3 जहाल नक्षलवादी ठार

अकोला : अल्पवयीन मुलीवर अत्याचार

निराधार बालकांना मिळणार आधार; बेवारस मुलांना मिळणार सन्मानाची ओळख

भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेच्या शिष्यवृत्तीने दिलं स्वप्नांना बळ

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सैन्याला मिळणार 156 अत्याधुनिक हेलिकॉप्टर्स
Next Article छत्तीसग़ड : चकमकीत 16 नक्षलवादी ठार

Latest News

संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ
महाराष्ट्र June 18, 2025
केदारनाथ मार्गांवर जंगलछट्टीजवळ दरड कोसळल्याने दोघांचा मृत्‍यू, तीन जखमी
देश - विदेश June 18, 2025
आंध्रप्रदेश : गजरला रवीसह 3 जहाल नक्षलवादी ठार
महाराष्ट्र June 18, 2025
अकोला : अल्पवयीन मुलीवर अत्याचार
महाराष्ट्र June 18, 2025
नाशिकरोड-द्वारका उड्डाणपुलाचा मार्ग होणार मोकळा, खासदार वाजेंच्या मागणीला यश
Top News June 18, 2025
हैदराबाद : विमानतळावर बॉम्ब स्फोटाची धमकी
देश - विदेश June 18, 2025
निराधार बालकांना मिळणार आधार; बेवारस मुलांना मिळणार सन्मानाची ओळख
महाराष्ट्र June 18, 2025
भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेच्या शिष्यवृत्तीने दिलं स्वप्नांना बळ
महाराष्ट्र June 18, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?