पुणे, 31 मार्च (हिं.स.)।
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या भारतरत्न जे. आर. डी. टाटा अर्थसाहाय्य योजनेसाठीची अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार ३१ ऑगस्ट २०२१ ते २१ एप्रिल २०२५ या कालावधीत पीएच.डी.साठी नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार असून, अर्ज करण्यासाठी २१ एप्रिल ही अंतिम मुदत आहे.
विद्यापीठाने याबाबतचे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांमध्ये संशोधनवृत्ती वाढीस लागून आर्थिक अडचणींचा सामना न करता पीएच.डी.चे संशोधन दर्जेदार करता येण्यासाठी विद्यापीठ विभाग, विद्यापीठाशी संलग्न संशोधन केंद्रात प्रवेशित विद्यार्थ्यांना २०१८ पासून ‘भारतरत्न जे.आर.डी. टाटा गुणवंत संशोधक शिष्यवृत्ती योजना’ लागू करण्यात आली. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून या योजनेचे नाव बदलून भारतरत्न जे.आर.डी. टाटा अर्थसाहाय्य योजना असे करण्यात आले आहे.