Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मुख्यमंत्र्यांकडून कॅन्सर सोबत लढणाऱ्या अमरावतीच्या तरुणाला 30 लाख रुपयांची मदत
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांकडून कॅन्सर सोबत लढणाऱ्या अमरावतीच्या तरुणाला 30 लाख रुपयांची मदत

admin
Last updated: 2025/04/01 at 12:38 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

अमरावती, 1 एप्रिल (हिं.स.)

अमरावतीतील २३ वर्षीय नावेद अब्दुल नईम या तरुणासाठी यंदाची ईद एक नवीन आशा घेऊन आली आहे. गेल्या काही वर्षांपासून तो ब्लड कॅन्सरशी (तीव्र लिम्फोब्लास्टिक ल्युकेमिया) लढतोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संवेदनशीलतेमुळे आणि मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांच्या तत्परतेने नावेदवर मुंबईतील कोकिलाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू झाले असून, त्याच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मदतीचा हात पुढे न केला असता, तर कदाचित मी आज हसत बोलत आपल्यासमोर उभा राहू शकलो नसतो. त्यांनी आम्हाला खरी ईदी दिली असे भावनिक उद्वार नावेदने काढले.

२०२३ मध्ये पहिल्यांदा निदान झालेल्या या आजाराने पुन्हा डोके वर काढल्याने नावेदच्या कटुंबावर मोठे संकट आले. त्याच्या वडिलांची आर्थिक परिस्थिती बेताची असून, ते अमरावतीतील एका कापड दुकानात काम करतात. तीन मुलींचे शिक्षण आणि संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी पार पाडत असताना नावेदच्या उपचारासाठी आवश्यक असलेले ३० ते ३५ लाख रुपये उभे करणे त्यांना अशक्यप्राय होते. उपचारासाठी लागणाऱ्या खर्चाची रक्कम ऐकून कुटुंबियांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यानंतर नावेदच्या वडिलांनी अमरावतीचे आमदार संजय खोडके व सुलभा खोडके यांच्याकडे धाव घेतली. आमदारांनी परिस्थिती समजून घेत,

त्यांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मिळवण्यासाठी मार्गदर्शन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संवेदनशील दृष्टिकोनामुळे नावेदला तातडीने मदत मिळाली. मुख्यमंत्री सहायता निधीतून २ लाख रुपये, टाटा ट्रस्टकडून १५ लाख रुपये, तर उर्वरित रक्कम धर्मादाय रुग्णालयाच्या मदतीतून कोकिलाबेन हॉस्पिटल आणि काही प्रमाणात सिद्धिविनायक ट्रस्टकडून मिळाली. या मदतीमुळे नावेदच्या उपचारांचा मार्ग सुकर झाला. मुंबईतील कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये नावेदवर अत्याधुनिक उपचार सुरू करण्यात आले आहेत.

सध्या नावेदवर मिनी हायपर सीव्हीएडी किमोथेरपी आणि इतर औषधोपचार सुरू आहेत. त्याच्या २१ वर्षीय बहिणीची एचएलए जुळणी झाल्याने ती दाता म्हणून पात्र ठरली आहे. ४ एप्रिल रोजी तिच्या स्टेम सेल्स नावेदच्या शरीरात प्रत्यारोपित करण्यात येणार आहेत.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पृथ्वीवर परतल्यानंतर अंतराळवीर सुनीता विल्यम्सने केल्या भावना व्यक्त
Next Article वैद्यकीय अधिकारी गट-ब कंत्राट भरती : ५० उमेदवारांच्या कागदपत्रांची होणार पडताळणी

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?