Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: दोन महिन्यात राज्याचे नाट्यगृहधोरण आणणार – आशिष शेलार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

दोन महिन्यात राज्याचे नाट्यगृहधोरण आणणार – आशिष शेलार

admin
Last updated: 2025/04/03 at 11:54 AM
admin
Share
3 Min Read
SHARE

वर्धा, 3 एप्रिल (हिं.स.)।

महाराष्ट्र हे कलासंपन्न राज्य असून नाटक हा कलाविष्कार येथे जोपासल्या जातो. नाट्य संस्कृतीत महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे. असे असतांना नाट्यगृह कसे असावे, कलावंतांना व प्रेक्षकांना काय सुविधा असाव्यात याबाबतीतील सर्वंकष नाट्यगृह धोरण येत्या दोन महिन्यात तयार करण्यात येईल, अशी घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी केली. या धोरणाच्या आधारेच यापुढे राज्यातील सर्व नाट्यगृहाची निर्मिती करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

नगर परिषद देवळीच्या वतीने बांधण्यात आलेल्या राजे छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहाचे लोकार्पण व विविध विकास कामाच्या भूमिपूजन सोहळ्यात ते बोलत होते.

महाराष्ट्राची 1823 पासुनची कलासंस्कृतीची परंपरा असून या कला संस्कृतीचे जतन जपणूक करणे महत्वाचे आहे. यासाठी राज्य शासन रस्ते, आरोग्य, शिक्षण, पाणी महिलासाठी विविध कल्याणकारी योजनांसोबतच राज्यातील कलाकारांच्या कलागुणांना वाव देऊन त्यांना आर्थिक संपन्न करण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे आशिष शेलार म्हणाले. या नाट्यगहृातून वर्षभर विविध कार्यक्रमाचे आयोजन होऊन नगर पालिकेला उत्पन्नाचे साधन निर्माण होईल अशा आशावाद त्यांनी यावेळी केला.

शासकीय विविध कार्यक्रमासाठी या नाट्यगृहाचा वापर व्हावा यासाठी अशा सुचनाही यावेळी आशिष शेलार यांनी दिल्या.

सांस्कृतिक कार्य मंत्री झाल्यानंतर नाट्यगृहाचे हे पहिलेच लोकार्पण असल्याचे सांगून आशिष शेलार म्हणाले की, देवळी येथील नाट्यगृह अतिशय देखणे आहे. या नाट्यगृहात राज्य व देशपातळीवर नाव लौकिक करणारे कलावंत निर्माण होतील, असेही आशिष शेलार म्हणाले.

जिल्ह्यातील देवळी ही क वर्ग दर्जाची नगर पालिका असतांना सुध्दा ईनडोअर स्टेडीअम, अत्याधुनिक नाट्यगृहाची निर्मिती सोबतच विविध विकास कामे नगर परिषदेच्यावतीने करण्यात आले आहे. ही देवळी नगर परिषेदेसाठी भुषणावह बाब आहे. देवळीच्या विकासासाठी राज्य शासनाच्यावतीने निधीची कमी पडू देणार नाही, असे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर म्हणाले.

देवळी हे महामार्गाला जोडलेले शहर असल्यामुळे येथे दळणवळणाच्या पर्याप्त प्रमाणात सुविधा उपलब्ध असून येथील रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करणार असल्याचे आ. राजेश बकाने म्हणाले. देवळी मतदार संघांतर्गत येणा-या वर्धा तालुक्यातील सेवाग्राम येथे सांस्कृतिक भवन व पत्रकार भवनाची निर्मिती व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी योवळी केली.

हिंगणघाट येथे सांस्कृतिक भवनासाठी 17 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून जागेअभावी सांस्कृतिकभवनाचा प्रस्ताव तांत्रिक अडचणीमुळे प्रलंबित असल्याने यावर शासनस्तरावर प्रयत्न करावा, असे आ. समिर कुणावार म्हणाले.

देवळी येथे चांगले खेळाडू व कलाकार निर्माण होण्यासाठी स्टेडीअम सोबतच नाट्यगृहाची निर्मिती करण्यात आली असून येथील कलागुणांना वाव मिळेल. आर्वी येथील सांस्कृतिक भवन करीता निधी मंजूर झाला असून जागेच्या प्रशासकीय कामाच्या अडचणीमुळे प्रस्ताव प्रलंबित असल्याची खंत यावेळी आ. दादाराव केचे यांनी व्यक्त केली.

या नाटयगृहामुळे येथील कलाकाराच्या कलागुणांना वाव मिळण्यासोबत व्यावसायिक दृष्टया नगर पालिकेला एक उत्पन्नाचे साधन मिळाले आहे. देवळीमध्ये खेळाडूसाठी इडोअर स्टेडीअमची निर्मिती करण्यात आली असून खेळाडूंच्या निवासासाठी वसतिगृह बांधकामासाठी निधी उपलब्ध व्हावा, अशी अपेक्षा यावेळी रामदास तडस यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजना अनुदान अंतर्गत सन २०१५-१६ वर्षात मंजूर झालेल्या राजे छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह लोकार्पण व ८ कोटी ५० लक्ष रुपये किमतीच्या विविध विकास कामाचे भूमिपूजन उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले. ६०० आसन क्षमता असलेल्या या नाट्यगृहाचे बांधकाम १२ कोटी रुपये खर्च करून करण्यात आले आहे.

यावेळी मंत्री महोदयाचे हस्ते नाट्य चळवळीत योगदान देणा-या, कलाकार, साहित्यकारांचा तसेच भजनी मंडळींना टाळचे वितरण करण्यता आले.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मध्य रेल्वेची आर्थिक वर्षात उल्लेखनीय कामगिरी
Next Article विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख शिक्षण आणि प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध – चंद्रकांत पाटील

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?