सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील मोहोळचे आमदार यशवंत माने यांचे बोगस जात प्रमाणपत्र असल्याचा दावा भाजपाचे नेते तथा मोहोळमधून पराभूत झालेले उमेदवार नागनाथ क्षीरसागर यांच्या मुलाने आज शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन पुराव्यांसह आरोप केला आहे.
मोहोळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार यशवंत विठ्ठल उर्फ विठोबा माने यांनी निवडणुकीत सादर केलेला दाखला तसेच त्या आधीचा त्यांच्याकडे वेगळा दाखला आहे. दोन दाखले सादर करून वेगवेगळे फायदे त्यांनी करून घेतले आहेत, अशी तक्रार शिवसेनेचे सोमेश नागनाथ क्षीरसागर यांनी मोहोळ पोलिसात केली आहे. जात पडताळणी दाखल याबाबतही समितीकडे आक्षेप नोंदवले आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आज पत्रकार परिषदेत त्यांनी याविषयी सविस्तर कागदपत्र सादर केली. यशवंत माने यांनी हिंदू कैकाडी अनुसूचित जाती या जातीचा दाखला चिखली जिल्हा बुलढाणा येथील रहिवासी नसताना खोटी कागदपत्र जोडून मिळवला, असे तक्रारीत म्हटले आहे. सोमेश यांचे वडील नागनाथ क्षीरसागर यांनी विधानसभा निवडणूक आमदार यशवंत माने यांच्याविरोधात लढविली होती.यात त्यांना पराभव पत्करावा लागला होता.