Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: चालत्या रेल्वेत महिलेने दिला कन्यारत्नाला जन्म
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

चालत्या रेल्वेत महिलेने दिला कन्यारत्नाला जन्म

admin
Last updated: 2025/04/05 at 4:55 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

नाशिक, 5 एप्रिल (हिं.स.)। – वाराणसीहून मुंबईकडे जाणाऱ्या

महानगरी एक्सप्रेसमध्ये आज सकाळी एक महिला प्रसूत झाली. या महिलेस कन्या रत्न प्राप्त झाले असून लोहमार्ग पोलीस, रेल्वे सुरक्षा दल व बिटको रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाने रेल्वे स्थानकावर धाव घेत बाळ-बाळांतिणीस उपचारार्थ दाखल केले असून दोघांचीही प्रकृती चांगली आहे.

याबाबतचे अधिक वृत्त असे की, मध्य प्रदेशातील महाराजगंज (छत्रपूर) येथील मंगल कोंडाम हे पत्नी रत्ना (वय २६) सह महानगरी एक्सप्रेसने मुंबई कडे जात होते. रेशमा या गर्भवती असल्याने त्यांना भुसावळ स्थानकावरून गाडी सुटल्यानंतर प्रसूती कळा होऊ लागला. सह महिला प्रवाशांनी महिलेला धीर देत काही प्रवाशांनी फोन द्वारे रेल्वे विभागाला कळवले. माहिती प्राप्त होताच भुसावळ नियंत्रण कक्षाने याबाबत नाशिकरोड रेल्वे स्थानक व लोहमार्ग पोलिसांना कळवले.

त्यानुसार, बिटको रुग्णालयाच्या डॉ. निलम तोरसकर, डॉ. तनुजा बागूल, डॉ. आदिनाथ सुडके लोहमार्ग पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक सचिन बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सोनवणे, हवालदार श्रीमती शिरसाठ, आरपीएफचे निरीक्षक हरफूल सिंग यादव यांच्या मार्गदर्शनाखाली आर पी एफ चे जवान राज यादव, मनिष सिंग हे रेल्वे स्थानकावर सज्ज होते.

महानगरी एक्सप्रेस सकाळी ७.१५ वाजता प्लॅटफार्म क्रमांकावर आली असता वैद्यकीय पथक तसेच रेल्वे पोलिसांनी जनरल डब्याकडे धाव घेऊन कोंडाम दाम्पत्याला उतरवून घेतले. या महिलेने मुलीला जन्म दिला असून त्यांना उपचारार्थ बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांसह, वैद्यकीय पथकाचे कौतूक

पुणे येथील एका नामांकित धर्मार्थ रुग्णालयात गर्भवती महिलेस पैशांअभावी दाखल करून न घेतल्याने तिचा प्रसुती दरम्यान मृत्यू झाला. या महिलेने जुळ्या मुलींना जन्म दिला. मात्र जन्मतःच या मुलींना मातृसुखाला गमवावे लागले. यामुळे संपूर्ण राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे पोलीस तसेच बिटको रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाने एका प्रवासी महिलेसाठी दाखवलेल्या तत्परतेमुळे रेल्वे प्रवाशांनी कौतूक केले आहे.

You Might Also Like

भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी

रेल्वे प्रवाशांसाठी ‘रेलवन’ सुपर अ‍ॅप लॉंच; सर्व सुविधा आता एका ठिकाणी

ट्रम्प यांनी ‘वन बिग ब्युटीफुल बिल’ मंजूर केल्यास मस्क नवीन पक्ष करणार स्थापन

राजधानीत वसंतराव नाईक जयंती साजरी

ट्रम्प यांच्या पक्षातील नेत्याची भारताला नव्याने टॅरिफ लावण्याची धमकी

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article कारागृहात मिळतेय गीतेतून जीवन जगण्याची नवी दृष्टी
Next Article माजी पंतप्रधानांच्या पत्नीची सुरक्षा कमी केली

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?