Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: गरोदर मातांचे व त्यांची काळजी घेणा-या कुटुंबियांचे प्रबोधन करा – नमुंमपा आयुक्त
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

गरोदर मातांचे व त्यांची काळजी घेणा-या कुटुंबियांचे प्रबोधन करा – नमुंमपा आयुक्त

admin
Last updated: 2025/04/08 at 1:22 PM
admin
Share
3 Min Read
Educate pregnant mothers and families taking care of them - NMMP Commissioner
SHARE

नवी मुंबई, 8 एप्रिल (हिं.स.)।

जागतिक आरोग्य दिनाची या वर्षीची संकल्पना निरोगी सुरुवात आणि आशादायक भविष्य ही असून त्यास अनुसरुन निरोगी सुरुवातीच्या दृष्टीने शून्य ते चार वयोगटातील बालकांच्या आरोग्यावर विशेष लक्ष केंद्रीत केले पाहिजे, असे सांगत महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी बालमृत्यू व गरोदर माता मृत्यू यांचे प्रमाण शून्य करण्यासाठी गरोदर मातांचे व त्यांची काळजी घेणा-या कुटुंबियांचे प्रबोधन करावे, असे सांगितले.

नवी मुंबई महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने नेरुळ येथील माँसाहेब मिनाताई ठाकरे रुग्णालयात आयोजित विशेष समारंभ प्रसंगी आयुक्तांनी उपस्थित डॉक्टर्स, नर्सेस व वैद्यकिय कर्मचारी यांना जागतिक आरोग्य दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या व आरोग्य विभागामार्फत चांगले काम सुरु असल्याचे सांगत अधिक उत्तम काम करुन नागरिकांना समाधानकारक आरोग्य सेवा पुरविण्यासाठी काम करु या, अशी अपेक्षा व्यक्त केली.

यावेळी आयुक्तांनी भारतातील बालके व गरोदर माता मृत्यू प्रमाण आणि लसीकरण याची आकडेवारी सांगत नवी मुंबईमधील स्थिती या बाबत सर्वोत्तम राहिल हे लक्ष्य ठेवून काम करण्यास सांगितले. या दृष्टीने नागरिकांशी दैनंदिन थेट संबध येणा-या आशा सेविका तसेच एएनएम यांची जबाबदारी मोठी असल्याचे सांगत यांचेमार्फत प्रबोधन व्हावे व निरीक्षण ठेवण्यात यावे, अशा सुचना आयुक्तांनी केल्या.

महानगरपालिकेच्या बालवाडी, अंगणवाडीतील शुन्य ते तीन वर्षाच्या बालकांची तपासणी होत असते. या व्यतिरिक्त खाजगी अंगणवाडीत जाणा-या बालकांचीही आरोग्य तपासणी करण्याकडे विशेष लक्ष द्यावे असे आयुक्तांनी सूचित केले. आधुनिक शहर म्हणून ओळखल्या जाणा-या नवी मुंबई शहरातील बालके कुपोषित राहू नयेत यादृष्टीने महापालिका रुग्णालयात न्यूट्रिशन रिहॅबिलेटेशन सेंटर सुरु करावे तसेच एनआरसी युनिट तातडीने कार्यान्वित करण्याची कार्यवाही करावी असे आयुक्तांनी निर्देश दिले.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने अनेक उल्लेखनीय कामे करण्यात येतात. त्या कामांची व्यवस्थित नोंद करुन डॉक्युमेंटेशन करावे, जेणेकरुन इतरांना ते मार्गदर्शक ठरेल अशाही सुचना आयुक्तांनी यावेळी दिल्या.

जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून ऐरोली रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ. रविंद्र म्हात्रे व वाशी रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक राजेश म्हात्रे यांना त्यांच्या सहका-यांसह सर्वोत्तम रुग्णालय म्हणून प्रशस्तिपत्र देउुन सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे सर्वोत्तम प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रांचा सन्मान अनुक्रमे नेरुळ फेज 1, सिबीडी बेलापूर व नोसील नाका या केंद्रांना प्रदान करण्यात आला. 477 आशा सेविकांमधून प्रतिक्षा पांचाळ, सुशिला कोकणे, अनिशा शेख यांना सर्वोत्तम आशा सेविका म्हणून प्रशस्तिपत्र प्रदान करुन गौरविण्यात आले.

वैद्यकिय अधिकारी प्रशांत जवादे यांनी मागील वर्षाभरात आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार आरोग्य सेवेत करण्यात आलेल्या विविध सुविधा कामांचा व सुधारणांचा सविस्तरआढावा घेतला.

You Might Also Like

राष्ट्रवाद आणि राष्ट्रीय सुरक्षेचे मुद्दे राजकीय पक्ष व हितसंबंधांच्या पलीकडील – उपराष्ट्रपती

सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी असलेल्या उजनी धरणात 50 टक्के पाणीसाठा

सोलापूर-दिल्ली विमानसेवा नोव्हेंबरपासून सुरू होणार

मोहोळ तालुक्‍यातील लांबोटी येथे पोलिसांच्या चकमकीत सराईत गुन्हेगार ठार

सोलापूर – गाडीतून पडून भाजीपाला विक्रेत्याचा दुदैवी मृत्यू

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article Selection list of scholarship eligible students from National Economically Weaker Sections is available on the website. राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकातील शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांची निवड यादी संकेतस्थळावर
Next Article हगलूर येथील राणी जाधव यांच्यावर सावकारी गुन्हा दाखल

Latest News

संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ
महाराष्ट्र June 18, 2025
केदारनाथ मार्गांवर जंगलछट्टीजवळ दरड कोसळल्याने दोघांचा मृत्‍यू, तीन जखमी
देश - विदेश June 18, 2025
आंध्रप्रदेश : गजरला रवीसह 3 जहाल नक्षलवादी ठार
महाराष्ट्र June 18, 2025
अकोला : अल्पवयीन मुलीवर अत्याचार
महाराष्ट्र June 18, 2025
नाशिकरोड-द्वारका उड्डाणपुलाचा मार्ग होणार मोकळा, खासदार वाजेंच्या मागणीला यश
Top News June 18, 2025
हैदराबाद : विमानतळावर बॉम्ब स्फोटाची धमकी
देश - विदेश June 18, 2025
निराधार बालकांना मिळणार आधार; बेवारस मुलांना मिळणार सन्मानाची ओळख
महाराष्ट्र June 18, 2025
भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेच्या शिष्यवृत्तीने दिलं स्वप्नांना बळ
महाराष्ट्र June 18, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?