Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: वन्‍यप्राण्यांनाही तीव्र पाणी टंचाईच्या झळा, पाणवठ्यांवर टँकरने पाणीपुरवठा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

वन्‍यप्राण्यांनाही तीव्र पाणी टंचाईच्या झळा, पाणवठ्यांवर टँकरने पाणीपुरवठा

admin
Last updated: 2025/04/11 at 12:52 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

अमरावती, 11 एप्रिल (हिं.स.)

मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत आटल्याने वन्य प्राण्यांना देखील पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यातच कृत्रिम पाणवठेही कोरडे पडल्याने पाण्याअभावी वन्य प्राण्यांची पाण्यासाठी पळापळ सुरू झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मागील दहा बारा वर्षांपासून मेळघाटातील बारमाही वाहणाऱ्या नदी, नाले आपले अस्तित्व गमावून बसले आहे. नैसर्गिक पाणवठे आटत चालले आहेत.

वनविभागाने जंगलातील अनेक ठिकाणी कृत्रिम पाणवठे तयार केल्याने वन्यप्राण्यांची तृष्णातृप्ती होत आहे. वनविभागाकडून आता कृत्रिम पाणवठ्यांवर टँकर तसेच सोलर पंपांद्वारे नियमित पाणीपुरवठा सुरू झाला आहे.नैसर्गिक अधिवासाला पहली पंसती देणारे वन्यप्राणी जलस्रोत आटल्यामुळे अधिवास सोडून स्थलांतरित करण्याची शक्यता असते.

सध्‍या कृत्रिम पाणवठ्यावर आपली तहान भागविण्यासाठी वन्यप्राणी हे जंगलात भटकत असल्याचे चित्र दिसत आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पात वन्यप्राण्यांची तहान भागविण्यासाठी अनेक नैसर्गिक पाणवठे आहेत. पण यंदा वाढत्या उन्हामुळे हे नैसर्गिक स्रोत आटले आहेत.

मेळघाटातील सिपना, गडगा, मेलडोह, खंडू, खापरा, राजादही, डवाल, कुकरी अशा जंगलातून निघालेल्या नद्यांचा प्रवाह एप्रिल सुरू होण्‍याच्‍या आधीच आटला. त्यामुळे वनअधिकारी वन्यप्राण्यांच्या मदतीला धावून आले आहेत. रखरखत्या उन्हाळ्यात व्याघ्र प्रकल्पातील अधिकारी, कर्मचारी, वनपाल, पाणवठ्यात टँकरने पाणी पुरवठा करताना दिसत आहेत. हतरू, रायपूर, जारीदा, सेमाडोह, हरिसाल, चौराकुंड, तारूबांदा, हरिसाल, सेमाडोह येथील वनपरिक्षेत्र अधिकारी आपल्या ताफ्यासह या पाणवठ्यावर लक्ष केंद्रित करून वन्यप्राण्यांच्या पाण्याची व्यवस्था करीत आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांच्या समोरील पाणी टंचाईची तीव्रता काही प्रमाणात कमी झाली आहे.

मेळघाटात भरपूर पाऊस होत असला तरी सर्व पाणी डोंगरावरून खाली वाहून जात असल्याने या भागात पाण्याची मोठी टंचाई असते. अशा परिस्थितीत उन्हाळ्यात वाघ, बिबट, अस्वल, रानगवे, सांबार, हरिण, नीलगाय या वन्यप्राण्यांसह विविध पक्ष्यांच्या तृष्णातृप्तीसाठी कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले आहेत.जंगलात ज्या भागात उन्हाळ्यातही पाणी असणारी विहीर आहे, यासह ज्या भागात बोअर आहे, अशा ठिकाणावरून सौर ऊर्जेचा वापर करून सिमेंट बशी आणि कृत्रिम पाणवठ्यात पाणी आणले जाते. जंगलात अनेक भागात सौरपंपांची व्यवस्था आहे. ज्या अडचणीच्या ठिकाणी सौर ऊर्जेची व्यवस्था नाही, अशा भागात असणाऱ्या सिमेंट बशी आणि कृत्रिम पाणवठ्यांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवले जाते.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article दिल्ली कॅपिटल्सच्या विजयानंतर केएल राहुलचं खास अंदाजात सेलिब्रेशन
Next Article मर्सिडिज-बेंन्झ इंडियाची यशस्वी कामगिरी; 4775 कार्सची विक्री

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?