Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: ठाकरे गटाचे आमदार सुनील राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

ठाकरे गटाचे आमदार सुनील राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल

admin
Last updated: 2025/04/11 at 1:28 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

मुंबई, 11 एप्रिल (हिं.स.)।शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार सुनील राऊत यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते अशा एकूण ३०० जणांविरोधात विक्रोळी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.सुनील राऊत यांच्यावर पोलिसांच्या परवानगीशिवाय निषेध केल्याचा आरोप आहे.

घरगुती सिलिंडरची किंमत ५० रुपयांनी वाढल्याने सरकारविरोधात विक्रोळी येथे पूर्वद्रुतगती मार्गावर बुधवारी(दि.९) शिवसेना विक्रोळी विधानसभेच्या वतीने आमदार सुनील राऊत यांच्या नेतृत्चाखाली विनापरवाना आंदोलन करून रॅली काढली. यावेळी तेथील इमारत क्रमांक ५२ व ५३ च्या मधील चिंचोळ्या वाटेतून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते पूर्व द्रुतगती मार्गावर पोहोचले. यावेळी २०० ते ३०० कार्यकर्त्यांनी रस्तावर थांबून निदर्शने केली. यावेळी पोलिसांनी त्यांना रस्त्यावरून हटण्याच्या सूचना केल्या. त्या सूचना कार्यकर्त्यांनी मानल्या नाही व निदर्शने सुरूच ठेवली. कार्यकर्त्यांनी रस्ता अडवला. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती. याप्रकरणी सर्व आंदोलनकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. विक्रोळी पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार श्रीकांत मांढरे यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

मुंबई पोलिसांचे म्हणणे आहे की, या निदर्शनामुळे लोकांना मोठ्या वाहतुकीचा सामना करावा लागला. यामुळे भारतीय न्याय संहिता कलम २२३, १२६ (२) व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१), १३५ अंतर्गत आमदार सुनील राऊत यांच्यासह विक्रोळी विधानसभा प्रमुख परम यादव, महिला विधानसभाप्रमुख सिद्धी जाधव, अनंत पाताडे, निलेश साळुंखे, माजी नगरसेविका रश्मी पहुडकर, आसावरी भोईटे, सिद्धी जाधव, सुशिला मंचेकर, प्रिया गावडे व २०० ते ३०० कार्यकर्त्यांविरोधात विक्रोळी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी विक्रोळी पोलीस सीसी टीव्हीच्या मदतीने इतर कार्यकर्त्यांची ओळख पटवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर
Next Article महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?