Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: निवडणुकीत कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे – सुभाष देशमुख
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

निवडणुकीत कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे – सुभाष देशमुख

admin
Last updated: 2025/04/17 at 3:53 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

सोलापूर, 17 एप्रिल (हिं.स.)।

ही निवडणूक कार्यकर्त्याची आहे, त्यामुळे या निवडणुकीत कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे. या भूमिकेतून भाजपचे ज्येष्ठ आमदार माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत उडी घेतली आहे.भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांसाठी आपण पॅनल उभे करणार असल्याचे सांगितले होते. परंतु त्यांच्या या पॅनलमध्ये काँग्रेसच्या एका नेत्याचा समावेश झाल्याने चर्चेला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

बाजार समिती निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक घडामोडी पाहायला मिळाल्या. सिद्धेश्वर शेतकरी विकास पॅनल आणि सिद्धेश्वर बाजार समिती परिवर्तन पॅनल असे दोन पॅनल झाल्याने आता ही निवडणूक रंगणार आहे. दोन्ही पॅनलचे नाव जरी सिद्धेश्वर असले तरी ही निवडणूक सुभाष देशमुख विरोधात सर्वपक्षीय आघाडी असेच होणार असल्याचे चित्र तयार झाले आहे. परिवर्तन पॅनलमध्ये युवा नेते मनीष देशमुख हा युवा चेहरा सर्वांचे लक्ष वेधून घेतोय.

विधानसभा निवडणुकीवळी सुभाष देशमुख यांच्या उमेदवारीला विरोध करणारे माजी संचालक आप्पासाहेब पाटील हे सुद्धा आता सुभाष देशमुख यांच्या पॅनलमध्ये सहभागी झाले आहेत. सुभाष देशमुख यांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांसाठी पॅनल उभे केले. तर, आपण त्यांना पाठिंबा देऊ अशी भूमिका आमदार विजयकुमार देशमुख यांनी मांडली होती. त्यामुळेही या निवडणुकीत रंगत निर्माण झाली आहे. सुभाष देशमुख हे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या निवासस्थानी चहासाठी जाणार आहेत. त्यामुळे या दोन्ही देशमुख नेत्यांच्या भेटीकडे सर्वांच्या नजरा लागले आहेत.

You Might Also Like

राष्ट्रवाद आणि राष्ट्रीय सुरक्षेचे मुद्दे राजकीय पक्ष व हितसंबंधांच्या पलीकडील – उपराष्ट्रपती

सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी असलेल्या उजनी धरणात 50 टक्के पाणीसाठा

सोलापूर-दिल्ली विमानसेवा नोव्हेंबरपासून सुरू होणार

मोहोळ तालुक्‍यातील लांबोटी येथे पोलिसांच्या चकमकीत सराईत गुन्हेगार ठार

सोलापूर – गाडीतून पडून भाजीपाला विक्रेत्याचा दुदैवी मृत्यू

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापूर कृउबा : दिवसभराच्या वेटिंग नंतर नरोळेंचे आले नाव, गणेश वानकरांना लॉटरी
Next Article सोलापूर – बाजार समितीसाठी भाजपच्या चार आमदारांत ‘काँटे की टक्कर’

Latest News

संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ
महाराष्ट्र June 18, 2025
केदारनाथ मार्गांवर जंगलछट्टीजवळ दरड कोसळल्याने दोघांचा मृत्‍यू, तीन जखमी
देश - विदेश June 18, 2025
आंध्रप्रदेश : गजरला रवीसह 3 जहाल नक्षलवादी ठार
महाराष्ट्र June 18, 2025
अकोला : अल्पवयीन मुलीवर अत्याचार
महाराष्ट्र June 18, 2025
नाशिकरोड-द्वारका उड्डाणपुलाचा मार्ग होणार मोकळा, खासदार वाजेंच्या मागणीला यश
Top News June 18, 2025
हैदराबाद : विमानतळावर बॉम्ब स्फोटाची धमकी
देश - विदेश June 18, 2025
निराधार बालकांना मिळणार आधार; बेवारस मुलांना मिळणार सन्मानाची ओळख
महाराष्ट्र June 18, 2025
भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेच्या शिष्यवृत्तीने दिलं स्वप्नांना बळ
महाराष्ट्र June 18, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?