ठाणे, 19 एप्रिल (हिं.स.)।
ठाण्याचे आमदार संजय केळकर हे दर सोमवारी आणि शुक्रवारी नागरिकांच्या समस्या निवारण करण्यासाठी भाजपाच्या खोपट कार्यालयात उपस्थित असतात.
आ. केळकर यांनी शुक्रवारी खोपट येथील कार्यालयात शेकडो नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या. यावेळी ठाणे जिल्हा हौसिंग सोसायटी फेडरेशन चे अध्यक्ष सीताराम राणे, माजी नगरसेवक नारायण पवार, सुनेश जोशी, भाजपा ठाणे शहर जिल्हा उपाध्यक्ष महेश कदम, दीपक जाधव, दत्ता घाडगे, ओमकार चव्हाण राजेश जाधव उपस्थित होते.
ठा म पा अंतर्गत अतिक्रमणे, इमारती मधील सोलर सिस्टम, वर्तकनगर येथील डेव्हलपमंन्ट विषय, रखडलेले डेव्हल्पमेन्ट, कोपरी येथील प्रसूतीगृह स्टाफ, पाणी विषय, पोलीस स्टेशन तक्रारी, विकासकाने केलेली फसवणूक, शैक्षणिक विषय, सहकार क्षेत्रातील विषय, कामगार विषय, जागा फसवणूक असे विविध विषयांवरील आज 58 निवेदने प्राप्त झाली.
आ. केळकर यांनी भेटायला आलेल्या नागरिकांच्या अडचणी, समस्या ऐकून घेतल्या व निवेदने स्वीकारली. यावेळी काही समस्यांचे निराकरण त्यांनी तिथेच संबंधित अधिकाऱ्यांशी दूरध्वनी वरून बोलून केले.
‘जनसेवकाचा जनसंवाद’ या उपक्रमामुळे आज अनेक ठाणेकऱ्यांच्या समस्या, अडचणी मार्गी लावण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करत आहे. एकप्रकारे समस्या निवारण केंद्र अशी ओळख या उपक्रमाची झाली आहे. या उपक्रमामुळे अनेक सामान्य नागरिकांना न्याय मिळत आहे, त्यामुळे ते समाधानी आहेत. ठाणे नव्हे तर डोंबिवली, कल्याण, दादर, अंबरनाथ, बदलापूर आदी विविध भागातून ही नागरिक समस्या घेऊन येत आहेत असे आ. केळकर यांनी बोलताना सांगितले.
—————