Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: उमर अब्दुल्लांचे विमान दिल्ली ऐवजी राजस्थानला पोहचले
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

उमर अब्दुल्लांचे विमान दिल्ली ऐवजी राजस्थानला पोहचले

admin
Last updated: 2025/04/20 at 2:51 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

दिल्लीत लँडिंग स्पेस नसल्यामुळे झाला मनस्ताप

नवी दिल्ली, 20 एप्रिल (हिं.स.) : जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांना विमान कंपनीच्या गैरव्यवस्थापनाचा चांगलाच फटका बसला. अब्दुल्ला जम्मूहून दिल्लीसाठी निघाले होते. परंतु, दिल्लीत विमानांची गर्दी असल्यामुळे त्यांचे विमान राजस्थानच्या जयपूर येथे लँड करावे लागले. त्यामुळे संतप्त झालेल्या अब्दुल्लांनी रात्री 1 वाजता ट्विट करत संताप व्यक्त केला आहे.

जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला शनिवारी रात्री इंडिगोच्या विमानाने दिल्लीला दिल्लीला निघाले होते. परंतु दिल्ली विमानतळावर विमानांची गर्दी असल्याने विमान उतरण्यासाठी जागा उपलब्ध नव्हती. त्यामुळे विमान दिल्लीत उतरू शकले नाही आणि विमान थेट जयपूरला वळवण्यात आले. तिथे रात्री उशिरा 1 वाजता विमान पोहचले. विमानातून उतरल्यानंतर मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचा पारा चढला. त्यांनी एक सेल्फी शेअर करत सोशल मीडियावरून संतप्त भावना व्यक्त केल्या. “दिल्ली विमानतळ म्हणजे एक संपूर्ण गोंधळाची परिस्थिती आहे. जम्मूहून निघाल्यानंतर 3 तास हवेत फिरवून आम्हाला जयपूरला वळवलें. आता मी विमानाच्या जिन्यावर उभा राहून थोडी ताजी हवा घेत आहे. इथून कधी निघणार, काहीच कल्पना नाही.” असे अब्दुल्ला यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. दरम्यान, शनिवारी श्रीनगर विमानतळावर खराब हवामानामुळे 6 विमाने रद्द करण्यात आली होती. यामुळे जम्मू विमानतळावरही अनेक प्रवासी अडकले होते. तिथे विमानांच्या उड्डानांना विलंब व रद्द होण्याच्या प्रकारांमुळे पूर्ण गोंधळाचे वातावरण होते. त्यामुळे शेकडो प्रवासी अडकल्यामुळे परिस्थिती अधिकच बिघडली होती.

——————————–

You Might Also Like

भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी

रेल्वे प्रवाशांसाठी ‘रेलवन’ सुपर अ‍ॅप लॉंच; सर्व सुविधा आता एका ठिकाणी

ट्रम्प यांनी ‘वन बिग ब्युटीफुल बिल’ मंजूर केल्यास मस्क नवीन पक्ष करणार स्थापन

राजधानीत वसंतराव नाईक जयंती साजरी

ट्रम्प यांच्या पक्षातील नेत्याची भारताला नव्याने टॅरिफ लावण्याची धमकी

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article रत्नागिरी जिल्ह्यात नव्या आठ कृषी उत्पन्न बाजार समित्या
Next Article उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांना नवनीत राणांच्या शुभेच्छा

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?