Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: भाजप महाराष्ट्रात संघटनबांधणीला नवे बळ; ९६३ मंडळ अध्यक्षांच्या नियुक्त्या पूर्ण
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

भाजप महाराष्ट्रात संघटनबांधणीला नवे बळ; ९६३ मंडळ अध्यक्षांच्या नियुक्त्या पूर्ण

admin
Last updated: 2025/04/20 at 2:55 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

मुंबई, 20 एप्रिल (हिं.स.)। भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश संघटनेत एक महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे .राज्यभरात एकूण १२२१ मंडळ स्थापन करण्यात आले आहेत. त्यापैकी ९६३ मंडळ अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ही प्रक्रिया अत्यंत नियोजनबद्ध आणि प्रभावी पद्धतीनं पूर्ण झाली आहे. “संघटन हेच खरे बळ” या तत्त्वावर चालत, भाजपनं आता महाराष्ट्रात मजबूत गड उभारण्याची तयारी सुरू केली आहे.

भाजपच्या संघटनात्मक बांधणीचा हा टप्पा महाराष्ट्राच्या सर्व भागांतील राजकीय ताकद दृढ करण्याच्या दृष्टीनं निर्णायक ठरतोय. संपूर्ण राज्यभर १२२१ मंडळ गठीत करण्यात आले आहेत, त्यापैकी ९६३ मंडळांची रचना जाहीर करण्यात आली असून, यातील २५८ मंडळे नव्यानं स्थापन केली गेली आहेत.

प्रमुख विभागवार पाहता:

• कोकण-ठाणे विभागात १८४ मंडळ

• उत्तर महाराष्ट्रात १८४ मंडळ

• पश्चिम महाराष्ट्रात २२२ मंडळ

• विदर्भात ३१३ मंडळ

• मराठवाड्यात २०७ मंडळ

• मुंबई विभागात १११ मंडळ

मंडळ गठीत करण्यात आले आहेत. या संपूर्ण नियुक्त्या केवळ आकडेवारी नाही, तर पक्षाची जनाधारावर आधारित शक्ती वाढवण्याचा प्रयत्न आहे. यातून भाजपच्या कार्यपद्धतीतील शिस्त, संघटन आणि वेळेचं भान प्रकर्षानं अधोरेखित होतं.

भाजपचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी एका संघटित आणि समर्पित कार्यपद्धतीची ही सुरुवात आहे. भाजपची रणनीती आता अधिक गावखेड्यांपर्यंत पोहोचवण्याचा आणि सर्वसामान्य मतदाराशी थेट संवाद साधण्याचा ध्यास घेतेय.

You Might Also Like

भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी

रेल्वे प्रवाशांसाठी ‘रेलवन’ सुपर अ‍ॅप लॉंच; सर्व सुविधा आता एका ठिकाणी

ट्रम्प यांनी ‘वन बिग ब्युटीफुल बिल’ मंजूर केल्यास मस्क नवीन पक्ष करणार स्थापन

राजधानीत वसंतराव नाईक जयंती साजरी

ट्रम्प यांच्या पक्षातील नेत्याची भारताला नव्याने टॅरिफ लावण्याची धमकी

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांना नवनीत राणांच्या शुभेच्छा
Next Article पंतप्रधानांकडून पवित्र व आनंदी ईस्टरच्या शुभेच्छा

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?