नवी दिल्ली : कोरोना विषाणूमुळे लागू करण्यात आलेले लॉकडाऊन आता आणखी शिथिल होणार आहेत. अनलॉक 4.0 संदर्भात नवीन नियम केंद्र सरकारने जारी केले आहेत. येत्या 1 सप्टेंबरपासून लॉकडाऊनचे नियम आणखी शिथिल होतील. 7 सप्टेंबरपासून मेट्रोला सशर्त परवानगी दिली असून 21 सप्टेंबरपासून धार्मिक कार्यक्रमात शंभर लोकांना सहभागी होण्याची परवानगीही दिली आहे.
एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जायला आता मुभा असेल. तसंच राज्यांतर्गत प्रवासासाठीही वेगळी परवानगीची आवश्यकता नाही, असं केंद्र सरकारच्या गाईडलाईन्स सांगतात. या नव्या नियमांमध्ये 30 सप्टेंबरपर्यंत शाळा बंदच राहतील, असं सांगण्यात आलं आहे. मेट्रो मात्र 7 सप्टेंबरपासून सुरू करता येऊ शकेल, असं केंद्र सरकारने सांगितलं आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
शाळा बंद असल्या तरी अनलॉक 4.0 मध्ये नववीच्या वरच्या वर्गातल्या विद्यार्थ्यांना त्यांना आवश्यकता असेल तेव्हा शाळेत जायची परवानगी देण्यात आली आहे. शाळा कॉलेज उघडण्यास मात्र अद्याप परवानगी दिलेली नाही. 30 सप्टेंबरपर्यंत शाळा कॉलेजला कुलूप राहणार आहे. ऑनलाइन आणि डिस्टन्स लर्निंग सुरुच राहील. राज्य आणि केंद्र शासित प्रदेशात 50 टक्क्यापर्यंत शिक्षक आणि इतर स्टाफ शाळेत बोलावता येणार आहे. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जायला आता ई पास किंवा परवानगीची आवश्यकता नाही.
* हे चालू तर हे बंदच
– 21 सप्टेंबरपासून धार्मिक कार्यक्रमात शंभर लोकांना सहभागी होण्याची परवानगी
– 30 सप्टेंबरपर्यंत शाळा आणि कॉलेजला कुलूपच राहणार
– थिएटर, मनोरंजन केंद्र, स्विमिंग पूल राहणार बंद
– शाळा बंदच, पण एका वेळी 50 टक्क्याहून कमी शिक्षकांना शाळेत बोलवायला परवानगी
– ऑनलाईन शिक्षणासंदर्भात कामासाठी निम्मे शिक्षक शाळेत जाऊ शकतात.
– नववी ते बारावी च्या विद्यार्थ्यांना त्यांना आवश्यकता असेल त्यावेळी पालकांच्या लिखित पूर्वपरवानगीसह शाळेत यायला परवानगी.
– शिक्षकांकडून मार्गदर्शन, पुस्तकं किंवा इतर साहित्य घेण्यासाठी माध्यमिक – शाळेतले विद्यार्थी पालकांच्या परवानगीने शाळेत शिक्षकांना भेटायला जाऊ शकतात.
– वय वर्षं 65 आणि त्यापुढच्या व्यक्तींनी ज्यांना काही आजार आहेत अशांनी आणि 10 वर्षांच्या आतल्या मुलांनी घरातच राहावं, असं आवाहन करण्यात आलं आहे. गरोदर स्त्रियांनीही गरज असल्याखेरीज घराबाहेर पडू नये.