Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: हार्वर्ड विद्यापीठाने ट्रम्प सरकारविरोधात न्यायलयात भरला खटला
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

हार्वर्ड विद्यापीठाने ट्रम्प सरकारविरोधात न्यायलयात भरला खटला

admin
Last updated: 2025/04/22 at 1:33 PM
admin
Share
3 Min Read
SHARE

वॉशिंगटन , 22 एप्रिल (हिं.स.)।आधीच टॅरिफच्या मुद्द्यावरून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना जनतेचा विरोध होत असताना आता ट्रम्प यांच्याविरोधात हार्वर्ड विद्यापीठ प्रशासन, प्राध्यापक आणि कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत. ट्रम्प प्रशासनाकडून गैरमार्गाने हार्वर्ड विद्यापीठावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करत हार्वर्ड विद्यापीठाने थेट न्यायालयात ट्रम्प सरकारविरोधात खटला भरला आहे

विद्यापीठाचे अध्यक्ष एलन. एम. गार्बर यांनी ट्रम्प प्रशासनाकडून गैरमार्गाने विद्यापीठावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी विद्यापीठाचा निधी थांबवण्याची धमकी दिली होती. प्रशासनाने स्थगिती दिल्यानंतर आता हार्वर्ड विद्यापीठाने थेट न्यायालयात ट्रम्प सरकारविरोधात खटला भरला आहे.विद्यापीठ प्रशासनाने मॅच्युसेट्स न्यायालयात ट्रम्प प्रशासनाविरोधात याचिका दाखल केली आहे. ‘ट्रम्प प्रशासन अभ्यासक्रम, नियुक्त्यांच्या प्रक्रियेवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा गंभीर आरोप याचिकेत करण्यात आला आहे. त्यामुळे अमेरिकेत नवा संघर्ष यानिमित्ताने उफाळून आला आहे.

विद्यापीठाचे अध्यक्ष गार्बर यांनी ट्रम्प प्रशासनाकडून विद्यापीठातील निर्णय नियंत्रण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला आहे. “मी एक ज्यू आहे आणि अमेरिकन म्हणून हे चांगल्या प्रकारे माहिती आहे की, ज्यू विरोधातील वाढत्या रोषाबद्दल व्यक्त केल्या जाणाऱ्या चिंता योग्यच आहेत. पण, सरकारने कायदेशीरपणे विद्यापीठाशी समन्वय ठेवला पाहिजे”, गार्बर म्हणाले.”प्रशासनाने विद्यापीठ नियंत्रण करण्याचा प्रयत्न करू नये. आम्ही कुणाची नियुक्ती करतो आणि काय शिकवतो, हे नियंत्रित करण्याचा प्रयत्न करू नये”, असे गार्बर यांनी म्हटले आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हार्वर्ड विद्यापीठावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी म्हटले होते की, “हार्वर्ड विद्यापीठ मुर्खांची आणि द्वेष पसरवणाऱ्यांची जागा बनली आहे. हे विद्यापीठा डाव्यांचा (कम्युनिस्ट) गड असल्याचे सांगितले जाते. २३ ऑक्टोबर २०२३ मध्ये इस्रायलने गाझा पट्टीत हल्ले केले होते. त्यावेळी हार्वर्ड विद्यापीठात त्याविरोधात आंदोलन झाले होते.” “हे विद्यापीठ ज्यूंबद्दल विरोधी प्रचार, प्रचार करत आहे आणि मुस्लिमांप्रति मवाळ भूमिका घेते. या विद्यापीठात गुणवत्तेच्या आधारावर प्रवेश दिले जात नाही. त्यामुळे या विद्यापीठाचा आपण निधी रोखू”, अशी धमकी ट्रम्प यांनी दिली होती.

सरकारकडून विद्यापीठाला दिल्या जाणाऱ्या निधीसंदर्भात ट्रम्प प्रशासनाने मोठा निर्णय घेतला. ट्रम्प यांच्या प्रशासनाने हार्वर्डला दिला जाणाऱ्या २.२ बिलियन निधीला स्थगिती दिली. त्यानंतर विद्यापीठ आणि ट्रम्प प्रशासन आमने-सामने आले आहे.हार्वर्ड विद्यापीठातील प्राध्यापक, अधिकारी आणि कर्मचारी ट्रम्प प्रशासनाविरोधात एकवटले आहेत. विद्यार्थीही या आंदोलनात सहभागी झाले आहेत. हार्वर्ड विद्यापीठाने आता ट्रम्प प्रशासनाला कोर्टामध्ये खेचले आहेत.

You Might Also Like

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

चीनला मागे टाकत हवाई दलाच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान खटल्याला ऍटर्नी जनरल यांची मंजुरी

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article अभिनेता महेश बाबूला ईडीचे समन्स
Next Article भारत 2060 पर्यंत सर्वाधिक मुस्लीम लोकसंख्येचा देश

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?