अहिल्यानगर दि 23 एप्रिल (हिं.स.) :- श्रीगोंदा तालुक्या तील एका महिलेवर बलात्कार केल्या प्रकरणातील आरोपी अजूनही मोकाट फिरत असल्याने पीडित महिला व त्यांच्या कुटुंबीयांच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालया
समोर उपोषण करण्यात आले.
या आंदोलनास बहुजन समाज पार्टीच्या वतीने पाठिंबा देण्यात आला. उपोषणात बसपाचे सुनिल ओव्हळ, सिंधुबाई जाधव, संजय जाधव, कचरू लष्करे, राजू शिंदे, शहानवाज शेख यांच्यासह पीडित महिलेचे कुटुंबीय सह भागी झाले होते.श्रीगोंदा तालुक्यातील एका गावातील महिलेला लग्नाचे आमिष दाखवून अविनाश कोठावळे (राहाणार कोठावळे सांगवी, तालुका पारनेर) याने वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले.पीडितेसोबत सहा महिने राहून तिला मारहाण करून घराबाहेर काढल्याची तक्रार पोलीस स्टेशन ला दाखल झाली आहे.
याप्रकरणी बेलवंडी (तालुका श्रीगोंदा) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र गुन्हा दाखल होऊन सहा महिने उलटूनही आरोपीस अटक करण्यात आलेली नाही.त्यामुळे उपोषण कर्त्यांनी आरोपीस त्वरित अटक करण्याची मागणी केली आहे.