श्रीनगर, 24 एप्रिल (हिं.स.)।पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे.जम्मू काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यातील बसंतगड जवळ सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. या दहशतवाद्यांच्या आणि सुरक्षा दलाच्या चकमकीत एक जवान हुतात्मा झाला आहे.अशी माहिती भारतीय लष्कराने दिली आहे . गेल्या २४ तासात जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेली ही सलग तिसरी चकमक आहे
मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू काश्मीर पोलिसांना एका घरात दहशतवादी लपल्याची टीप मिळाली होती. यानुसार लष्कराला सोबत घेत संयुक्त ऑपरेशन राबविण्यात आले आहे. उधमपूरच्या बसंतगडमध्ये ही चकमक सुरु झाली आहे. दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार सुरू आहे.या चकमकीत एक जवान शहीद झाला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दहशतवाद्यांविरोधातील ही तिसरी चकमक आहे. यापूर्वी बुधवारी (23 एप्रिल ) जम्मू आणि काश्मीर मधील पुलगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांमध्ये आणि सुरक्षा दलांमध्ये गोळीबार झाला होता .त्याचवेळी 23 एप्रिल रोजी सकाळी बारा मुलाच्या उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेष जवळ दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला होता .यावेळी सैन्याने दोन दहशतवाद्यांना ठार केले होते.
भारतीय लष्कराने पूंछमधील लसाना वनक्षेत्रात दहशतवाद्यांना पकडण्यासाठी जम्मू-काश्मीर पोलिसांच्या मदतीने विशेष ऑपरेशन सुरु केले आहे. राज्यभरात सर्वत्र शोधमोहिम राबविण्यात येत आहे. पहलगामच्या बैसरन भागात सुरक्षा दलांकडून मोठ्या प्रमाणात शोध मोहीम राबवली जात आहे. परिसरातील जंगलात कोम्बिंग ऑपरेशनसाठी अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहेत. संपूर्ण वनक्षेत्राला वेढा घालून ही मोहीम राबवली जात आहे. हल्ल्याच्या एका दिवसानंतर, पर्यटन स्थळी अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे.