Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: इस्त्रोचा ‘स्पाय सॅटेलाईट’ ठेवणार सीमेवर लक्ष
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

इस्त्रोचा ‘स्पाय सॅटेलाईट’ ठेवणार सीमेवर लक्ष

admin
Last updated: 2025/04/24 at 5:52 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली, 24 एप्रिल (हिं.स.) : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो) देशाच्या सीमांच्या संरक्षणात महत्त्वाचे योगदान देणार आहे. सीमांचे संरक्षण आणि निगराणीसाठी इस्त्रो विशेष गुप्तचर उपग्रहाच्या (स्पाय सॅटेलाईट) निर्मीतीवर वेगाने काम करीत आहे.

यासंदर्भातील माहितीनुसार इस्त्रो लवकरच एक विशेष “रडार इमेजिंग उपग्रह” प्रक्षेपित करण्यास सज्ज आहे. हा उपग्रह दिवसा व रात्री, तसेच ढगाळ हवामानातही चित्रण करू शकतो. त्यामुळे कोणत्याही हवामानात, कोणत्याही वेळेला, भारताच्या सीमेवर घडणाऱ्या घडामोडींवर नजर ठेवणे शक्य होणार आहे. हा उपग्रह “स्पाय सॅटेलाइट” म्हणून ओळखला जातो कारण त्याच्यापासून लपणे फार कठीण आहे. हा आकाशातील एक अचूक निरीक्षक आहे.

केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, इस्त्रो लवकरच पीएसएलव्ही-सी61 मोहीमेंतर्गत अत्याधुनिक ईओएस-09 उपग्रहाचे प्रक्षेपण करणार आहे. सी-बँड सिंथेटिक अपर्चर रडारने सुसज्ज असलेला ईओएस-09 उपग्रह कोणत्याही हवामानात, दिवसा अथवा रात्री, पृथ्वीच्या पृष्ठभागाचे हाय-रिझोल्यूशन चित्र घेण्यास सक्षम आहे. हा रडार इमेजिंग उपग्रह पूर्णतः भारतीय शास्त्रज्ञांनी विकसित केला आहे, आणि तो भारताच्या आंतराळात कार्यरत असलेल्या 50 हून अधिक उपग्रहांच्या ताफ्यात सामील होणार आहे. भारताचा आधीपासून कार्यरत असलेला कार्टोसॅट-3 उपग्रह कमी पृथ्वी कक्षेतून अर्धा मीटरपेक्षा कमी रिझोल्यूशनमध्ये चित्रे पाठवू शकतो. मात्र, तो उपग्रह रात्री चित्रण करू शकत नाही, ज्यामुळे शत्रू आपली साधने हालवू शकतो. पण, नवीन ईओएस-09 उपग्रह रात्री देखील काम करतो त्यामुळे शत्रू काय लपवत आहे हे सतत शोधून काढू शकतो.

​इस्त्रोने 1975 पासून आतापर्यंत एकूण 129 भारतीय उपग्रह आणि 342 परदेशी उपग्रह प्रक्षेपित केले आहेत. म्हणजेच एकूण 417 उपग्रह इस्रोने आत्तापर्यंत प्रक्षेपित केले आहेत. त्यापैकी 21 उपग्रह संचार, 8 उपग्रह नेव्हिगेशन, 21 उपग्रह पृथ्वी निरीक्षण आणि 3 उपग्रह विज्ञान या क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत. ​सन 2009 मध्ये सोडलेला रि-सॅट-2, त्यानंतर 2019 मध्ये सोडण्यात आलेले रिसॅट-2बी आणि रिसॅट-2बीआर-1, एप्रिल 2019 मध्ये सोडलेला EMISAT, Cartosat-2 Series तसेच फेब्रुवारी 2022 मध्ये प्रक्षेपित केलेला ईओएस-04 (रिसॅट-1ए) या उपग्रहाचा वापरही लष्करी कारणांसाठी केला जातो. याशिवाय यंदा 2025 मध्ये ईओएस-09 प्रक्षेपित केला जाणार आहे.

You Might Also Like

हैदराबाद : विमानतळावर बॉम्ब स्फोटाची धमकी

काश्मीर मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी स्वीकारली जाणार नाही – पंतप्रधान मोदी

अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, इराणकडून इस्राइल विरोधात युद्धाची घोषणा

कोणताही देश दहशतवादाला पाठिंबा देत असेल तर त्याला त्याची किंमत मोजावी लागेल – पंतप्रधान मोदी

भारत-कॅनडा करणार उच्चायुक्तांची पुनर्स्थापना

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापूर : उपलेखा परीक्षकाने घेतली दहा हजाराची लाच
Next Article पहलगाम दहशतवादी हल्ला : पीएसएलच्या प्रसारणावर भारतात बंदी

Latest News

नाशिकरोड-द्वारका उड्डाणपुलाचा मार्ग होणार मोकळा, खासदार वाजेंच्या मागणीला यश
Top News June 18, 2025
हैदराबाद : विमानतळावर बॉम्ब स्फोटाची धमकी
देश - विदेश June 18, 2025
निराधार बालकांना मिळणार आधार; बेवारस मुलांना मिळणार सन्मानाची ओळख
महाराष्ट्र June 18, 2025
भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेच्या शिष्यवृत्तीने दिलं स्वप्नांना बळ
महाराष्ट्र June 18, 2025
सांगलीच्या जयश्री पाटील यांचा शेकडो समर्थकांसह भाजपा प्रवेश
महाराष्ट्र June 18, 2025
पालखी सोहळ्यासाठी ३५०० पोलिसांचा बंदोबस्त, साध्या आणि वारकऱ्यांच्या वेशातही पोलीस
महाराष्ट्र June 18, 2025
काश्मीर मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी स्वीकारली जाणार नाही – पंतप्रधान मोदी
देश - विदेश June 18, 2025
वारकरी भक्तीयोग’कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता सर्वांनी पुढाकार घ्यावा – चंद्रकांतदादा पाटील
Top News June 18, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?