Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: ट्रू बीम लिनियर ॲक्सलरेटर उपचार प्रणालीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

ट्रू बीम लिनियर ॲक्सलरेटर उपचार प्रणालीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

admin
Last updated: 2025/04/27 at 3:27 PM
admin
Share
3 Min Read
SHARE

छत्रपती संभाजीनगर, 27 एप्रिल (हिं.स.)। येथील शासकीय कर्करोग रुग्णालयातील ट्रू बीम युनिट या कर्करोगावरील अतिविशेष उपचार देणाऱ्या अत्याधुनिक यंत्र प्रणालीचे व कर्करोग संस्थेच्या विस्तारीत भागाचे लोकार्पण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय आरोग्य,कुटुंब कल्याण व रसायने आणि खते मंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्या हस्ते करण्यात आले.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, इमाव कल्याण मंत्री अतुल सावे, राज्यसभा सदस्य खा. डॉ. भागवत कराड, खा. संदिपान भुमरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आ. सतिष चव्हाण, आ. नारायण कुचे, आ. अनुराधा चव्हाण, आ. संजना जाधव यांचीही यावेळी उपस्थिती होती. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, राज्य कर्करोग रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड, वैद्यकीय अधीक्षक डॉ. दर्पण जक्कल, वैद्यकिय शिक्षण आयुक्त राजीव निवतकर, संचालक डॉ. अजय चंदनवाले तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. त्यांनी मान्यवरांना यंत्रप्रणालीची माहिती दिली. राज्य कर्करोग संस्थेच्या विस्तारीकरणाचेही लोकार्पण यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

ट्रू बीम लिनियर ॲक्सलेटर प्रणाली

• शासकीय कर्करोग रुग्णालयाच्या रेडिएशन ऑनकोलॅाजी विभागात ट्रू-बिम लिनियर अॅक्सलरेटर ही जागतिक दर्जाची अद्ययावत उपचार प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे.

• रेडिएशन ऑनकोलॅाजी विभाग वर्ष १९८१ पासून कर्करूग्णांच्या सेवेत आहे.

• प्रामुख्याने मराठवाडा, विदर्भ, खान्देश व पश्चिम महाराष्ट्रातील जवळपास १४ जिल्ह्यातील गरीब व गरजू रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात येतात.

• येथे त्यांच्यावर महात्मा जोतीबा फुले जीवनदायी आरोग्य योजनेतून मोफत उपचार केले जातात.

• वाढती कर्करुग्णसंख्या व अद्ययावत उपचारप्रणाली विकसित होत असल्याने महाराष्ट्र शासनाने दि.२१ सप्टेंबर २०१२ पासून स्वतंत्रपणे समर्पित कॅन्सर हॉस्पिटल सुरू करण्यात आले आहे.

• केंद्र शासनाने ऑक्टोबर २०१६ मध्ये राज्य कर्करोग संस्था म्हणून मान्यता दिली आहे.

• दिवसेंदिवस कर्करुग्णसंख्या वाढत असल्यामुळे शासनाने रुग्णालयात ट्रू-बिम लिनियर अॅक्सलरेटर ही जागतिक दर्जाची अद्ययावत उपचार प्रणाली दि ३.१०.२०२४ पासून कार्यान्वित केली आहे.

• ट्रू बीम तंत्रज्ञानः-व्हेरियन ट्रूबीम (True Beam) हे state-of-the-art अत्याधुनिक मेडिकल लिनियर अॅक्सलरेटर असून त्याची किंमत अंदाजे २५ कोटी रुपये आहे.

• ही प्रणाली अचूक,नावीन्यपूर्ण आणि प्रगत रेडिएशन उपचार प्रदान करते.

• हे संयंत्र इमेज-गाइडेड रेडिओथेरपी (IGRT) आणि (IMRT) यासह प्रगत उपचार पर्यायांची विस्तृत श्रेणी देते.

• ही लवचिकता डॉक्टरांना प्रत्येक रुग्णाच्या विशिष्ट गरजेनुसार क्लिष्ट ठिकाणी असणाऱ्या कर्करोगाच्या गाठीवर उपचार करण्यास सुलभता देते.

• TrueBeam हे रूग्ण-केंद्रित उपचार मशीन आहे जे रूग्णाला आरामदायी आणि अत्यंत जटिल रेडिएशन योजना अचूकपणे वितरीत करून उपचार प्रदान करते.

• यामुळे उत्कृष्ट कार्यक्षमतेने आणि सातत्यपूर्ण उच्च-गुणवत्तेचे उपचार केले जातात.

• हे डोके आणि मान, मेंदू, स्तन, फुफ्फुस, अन्ननलिका, प्रोस्टेट आणि गर्भाशय यासह शरीरात कोठेही अत्यंत अचूक रेडिएशन उपचार प्रदान करते.

• पिनपॉइंट पोझिशनिंग, उच्च-गुणवत्तेचे सीटी इमेजिंग आणि ३६०-डिग्री रोटेशनल ही वैशिष्ट्ये आहेत.

• CT Simulator तंत्रः- किरणोपचार विभागात रेडिएशन उपचार करण्यापूर्वी कर्करुग्णांचे 3D सिमुलेशन करण्यासाठी LINAC संयंत्राचे संलग्न संयंत्र म्हणून सिटी सिम्युलेटर महत्वाचे आहे. सिटी इमेजेस वर कॅन्सर आजाराचे कंटूरिंग केल्यानंतर ट्रीटमेंट प्लॅनिंग करून Linac संयंत्रवर किरणोपचार केले जातात.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article जम्मू काश्मीर : ट्रेकिंग आणि पर्यटन मोहिमांवर तात्पुरती घातली बंदी
Next Article दररोज दीड लाख पुणेकरांना टँकरचा आधार

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?