मुंबई : शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी काँग्रेसच्या अंतर्गत विषयावर भाष्य केले आहे. काँग्रेस पक्ष हा त्यांच्या अंतर्गत समस्यांनी जर्जर झालेला दिसतोय. त्याची मलाही वेदना आहे. मी त्या विचाराचा नसलो तरी देशाच्या राजकारणात प्रमुख पक्ष टिकले पाहिजेत. तरच या देशाची संसदीय लोकशाही आणि स्वातंत्र्य टिकू शकते, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
काँग्रेसच्या अध्यपदावरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांसह भाजपवर आसूड ओढला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मूळ स्वप्न देश काँग्रेसमुक्त करण्याचेच होते. ते पूर्ण झाले नाही. तेव्हा काँग्रेस गांधी परिवारमुक्त करण्यासाठी काँग्रेसच्याच काही नेत्यांना भाजप आणि कॉर्पोरेट उद्योगपतींनी हाताशी धरले, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पंतप्रधान मोदी यांचे मूळ स्वप्न देश काँग्रेसमुक्त करण्याचेच होते. ते पूर्ण झाले नाही. तेव्हा काँग्रेस गांधी परिवारमुक्त करण्यासाठी काँग्रेसच्याच काही नेत्यांना भाजप आणि कॉर्पोरेट उद्योगपतींनी हाताशी धरले, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. राऊत यांनी दैनिक ‘सामना’तील ‘रोखठोक’ या सदरामधून भाजपवर हल्ला चढवला आहे. राहुल गांधी हे सतत सरकारच्या व्यवहारांवर टीका करीत आहेत.
अनेक उद्योगपतींना मोदींचे सरकार नियमबाह्य पद्धतीने लाभ पोहोचवीत असल्याचे आरोप ते करीत आहेत. यामुळे अस्वस्थ झालेल्या ‘कॉर्पोरेट’ लॉबीनेच काँग्रेस गांधीमुक्त करण्याचा विडा उचलला. सोनिया, प्रियांका, राहुल यांनी काँग्रेसच्या सक्रिय कार्यातून दूर व्हावे व ‘मार्गदर्शक’ मंडळाचे सभासद म्हणून काम करावे असे या सर्व मंडळींचे डावपेच होते. ते सफल झाले नाहीत, असे काँग्रेसमधील मोठ्या गटाचे म्हणणे आहे, असा दावाही त्यांनी केला आहे.
* राहुल गांधींनी डाव उधळून लावला
काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी रुग्णालयात असताना फक्त पत्र पाठवूनच काँग्रेसचे २३ नेते थांबले नाहीत, तर त्यानंतर आमच्या पत्रावर काय कार्यवाही केली अशी विचारणा करणारी दोन ‘रिमाइंडर्स’ म्हणजे स्मरणपत्रे पाठवली. हे जरा अतिच झाले. या पत्रांमुळे सोनिया गांधी वैतागून काँग्रेसचे अध्यक्षपद सोडतील व आता तुम्हीच काँग्रेस सांभाळा असे सांगतील असा या ‘पत्रलेखक’ नेत्यांचा डाव होता. तो राहुल गांधी यांनी उधळून लावला आहे. सोनिया गांधी काँग्रेस अध्यक्षपद सोडतील व त्यानंतर सामुदायिक नेतृत्व म्हणून हे ‘पत्रलेखक’ काँग्रेसवर ताबा मिळवतील हे सर्व भाजपला हवेच होते.