नवी दिल्ली , 29 एप्रिल (हिं.स.)।पहलगाम हल्ल्यानंतर अनेक देशांनी भारताला दहशतवादविरोधी पाठिंबा दर्शवला आहे.तर भारतातील विरोधी पक्षांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दहशतवादविरोधी पाठिंबा दिला आहे. दरम्यान काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान मोदींना याबाबत पत्र लिहले आहे.
काँग्रेस अधयक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी पत्रामध्ये म्हटले आहे की, “सध्या आपल्यातील एकता आणि ऐक्य फार आवश्यक आहे. या काळात विरोधकांना वाटते की, संसदेत दोन्ही सभागृहांचे विशेष अधिवेशन तातडीने बोलावणे महत्त्वाचे आहे. ही आपल्या सामूहिक निर्धाराची आणि इच्छाशक्तीची ठोस अभिव्यक्ती असेल. जी 22 एप्रिल 2025 रोजी पहलगाम येथे निरपराध नागरिकांवर झालेल्या निर्घृण दहशतवादी हल्ल्याचा सामना करण्यासाठी आवश्यक आहे. आम्हाला ही आशा आहे की, हे अधिवेशन लवकरात लवकर बोलावले जाईल असे खरगे यांनी पत्रात नमूद केले आहे.
—————