Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रति क्विंटल 355 रुपये रास्त आणि किफायतशीर भाव
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रति क्विंटल 355 रुपये रास्त आणि किफायतशीर भाव

admin
Last updated: 2025/04/30 at 7:04 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

यंदाच्या साखर हंगामासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

नवी दिल्ली, 30 एप्रिल (हिं.स.) – उस उत्पादक शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने 2025-26 (ऑक्टोबर – सप्टेंबर) साखर हंगामासाठी उसाचे रास्त आणि किफायतशीर मूल्य (एफआरपी) 10.25% च्या मूळ पुनर्प्राप्ती दरासाठी 355 रुपये प्रति क्विंटल दराने मंजूर केले आहे. यामध्ये 10.25% पेक्षा जास्त वसुलीत प्रत्येक 0.1% वाढीसाठी 3.46 रुपये प्रति क्विंटल प्रीमियम आणि वसुलीत प्रत्येक 0.1% घटीसाठी एफआरपी मध्ये 3.46 रुपये प्रति क्विंटल दराने कपात करण्यात आली आहे.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी सरकारने निर्णय घेतला आहे की ज्या साखर कारखान्यांची वसुली 9.5% पेक्षा कमी आहे त्यांच्या बाबतीत कोणतीही कपात केली जाणार नाही. अशा शेतकऱ्यांना 2025-26 च्या आगामी साखर हंगामात उसासाठी 329.05 रुपये प्रति क्विंटल मिळतील.

2025-26 च्या साखर हंगामासाठी उसाचा उत्पादन खर्च (ए2 +एफएल) 173 रुपये प्रति क्विंटल आहे. 10.25% च्या पुनर्प्राप्ती दराने 355 रुपये प्रति क्विंटल एफआरपी हा उत्पादन खर्चापेक्षा 105.2% अधिक आहे. 2025-26 च्या साखर हंगामासाठीचा एफआरपी चालू साखर हंगाम 2024-25 पेक्षा 4.41% जास्त आहे.

मंजूर केलेला एफआरपी 2025-26 च्या साखर हंगामात (1 ऑक्टोबर, 2025 पासून सुरु) साखर कारखान्यांद्वारे शेतकऱ्यांकडून ऊस खरेदी करण्यासाठी लागू असेल. साखर क्षेत्र हे एक महत्त्वाचे कृषी-आधारित क्षेत्र आहे ज्याचा प्रभाव सुमारे 5 कोटी ऊस उत्पादक शेतकरी आणि त्यांच्यावर अवलंबून असलेले तसेच शेतमजूर आणि वाहतूक यासारख्या विविध सहाय्यक कामांमध्ये काम करणाऱ्यांव्यतिरिक्त साखर कारखान्यांमध्ये प्रत्यक्ष काम करणाऱ्या सुमारे 5 लाख कामगारांच्या उपजीविकेवर पडतो.

पार्श्वभूमी

कृषी व्यय आणि मूल्य आयोगाच्या शिफारशींच्या आधारे आणि राज्य सरकारे आणि इतर हितधारकांशी सल्लामसलत केल्यानंतर एफआरपी निश्चित करण्यात आला आहे.

मागील साखर हंगाम 2023-24 मध्ये, 28.04.2025 पर्यंत शेतकऱ्यांना देय असलेल्या 1,11,782 कोटी रुपयांपैकी सुमारे 1,11,703 कोटी रुपये अदा करण्यात आले आहेत; अशा प्रकारे, 99.92% ऊस थकबाकी देऊन झाली आहे. चालू साखर हंगाम 2024-25, मध्ये, 28.04.2025 पर्यंत शेतकऱ्यांना देय असलेल्या 97,270 कोटी रुपयांपैकी सुमारे 85,094 कोटी रुपये अदा करण्यात आली असून उसाची 87% थकबाकी देऊन झाली आहे.

You Might Also Like

राजधानीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी

देशात कोरोना रुग्णांची संख्या 2710 झाली

नवीन वेळापत्रकानुसार कंपनीने ई-बसेसचा पुरवठा करावा – प्रताप सरनाईक

नव्या भारताने प्रतिशोधाची नवी ताकद दाखवली – पंतप्रधान

पाकिस्तानी मुस्लिमांनी धर्म विचारून हुिंदुंना मारले- प्रज्ञा ठाकूर

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article विशाखापट्टणम : नरसिंह स्वामी मंदिराची भिंत कोसळून ८ जणांचा मृत्यू
Next Article केंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकर

Latest News

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन
महाराष्ट्र May 31, 2025
राजधानीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी
देश - विदेश May 31, 2025
अहिल्यादेवी होळकर यांना जन्मत्रिशताब्दीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन
महाराष्ट्र May 31, 2025
देशात कोरोना रुग्णांची संख्या 2710 झाली
देश - विदेश May 31, 2025
अतिवृष्टी बाधित गावे मदतीपासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्या – जयकुमार गोरे
महाराष्ट्र May 31, 2025
शेतकऱ्यांच्या सुचनांना प्राधान्य – कृषीमंत्री
महाराष्ट्र May 31, 2025
महिलांनो, एसटी प्रवासात मोबाइल व दागिन्यांची घ्या विशेष काळजी
महाराष्ट्र May 31, 2025
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देणार – पालकमंत्री बावनकुळे
महाराष्ट्र May 31, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?