Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: युजवेंद्र चहल ठरला आयपीएलमध्ये हॅटट्रिक घेणारा पहिला गोलंदाज
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
खेळ

युजवेंद्र चहल ठरला आयपीएलमध्ये हॅटट्रिक घेणारा पहिला गोलंदाज

admin
Last updated: 2025/05/01 at 3:55 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

चेन्नई, 1 मे (हिं.स.)।पंजाब किंग्सचा फिरकीपटू आणि आयपीएल इतिहासातील सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज युजवेंद्र चहलने इतिहास घडवला आहे.चहलने २०२५ च्या आयपीएलच्या ४९व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गोलंदाजी करताना हॅटट्रिक केली आहे. याचसोबत चहल हा आयपीएल २०२५ मध्ये हॅटट्रिक घेणारा पहिला गोलंदाजही ठरला. याशिवाय २०२३ पासून आयपीएलमध्ये हॅटट्रिक घेणारा तो पहिला गोलंदाज आहे.

बुधवारी, ३० एप्रिलला चेपॉक स्टेडियमवर खेळवल्या जात असलेल्या सामन्यात, चहलने प्रथम गोलंदाजी करणाऱ्या पंजाब किंग्जसाठी १९ व्या षटकात हा अद्भुत पराक्रम केला. या षटकात भारतीय लेग-स्पिनरने ४ विकेट्स घेतल्या, ज्यामध्ये एमएस धोनीचा एक आणि हॅट्रिकचा समावेश होता. चहलने १९ व्या षटकाची सुरूवात वाईड बॉलने केली. मग धोनीने पहिल्या लीगल चेंडूवर षटकार मारला. पण इथून चहलने सामन्याचा रोख बदलला आणि स्वत:च्या नावे विक्रमही केला आहे. चहलने यानंतर दुसऱ्या चेंडूवर धोनीला आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवत झेलबाद केलं. त्यानंतर दीपक हुडाने तिसऱ्या चेंडूवर दोन धावा घेतल्या.

चहलने यानंतर सलग तीन चेंडूवर हॅटट्रिक घेतली. चौथ्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात दीपक हुडा प्रियांश आर्यकरवी झेलबाद झाला. पाचव्या चेंडूवर चहलने अंशुल कंबोजला क्लीन बोल्ड केलं. तर अखेरच्या चेंडूवर नूर अहमद मोठा फटका खेळायला गेला आणि यान्सनने त्याला झेलबाद केलं.आणि आयपीएल २०२५ मध्ये हॅटट्रिक घेणारा तो पहिला गोलंदाज ठरला. हॅटट्रिक घेताच चहलने त्याची आयकॉनिक पोज देत मैदानात बसला आणि अशारितीने चेन्नईचा डाव १९० धावांवर आटोपण्यात मोठी भूमिका बजावली.

चहलने हॅटट्रिक घेण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी चहलने २०२३ मध्ये ही कामगिरी केली होती. त्यावेळी राजस्थान रॉयल्सचा भाग असलेल्या चहलने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध हॅटट्रिक घेतली होती. यासह, तो आयपीएलमध्ये एकापेक्षा जास्त हॅटट्रिक घेणाऱ्या मोजक्या गोलंदाजांमध्ये सामील झाला. यामध्ये अमित मिश्रा, युवराज सिंग आणि रोहित शर्मा सारखी नावे आहेत.

You Might Also Like

आशियाई अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताला मिळाले सुवर्णपदक

लखनौला हरवून आरसीबी क्वालिफायर १ मध्ये दाखल

आयपीएल गाजवल्यानंतर वैभव सूर्यवंशीचे बिहारमध्ये जंगी स्वागत

मुंबई इंडियन्स संघाने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करत केली प्लेऑफ्समध्ये एन्ट्री

सूर्यकुमार यादवने टी-२० क्रिकेटमध्ये वर्ल्ड रेकॉर्डशी केली बरोबरी

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ’पुन्हा शिवाजीराजे भोसले’ : शिवराय येताहेत, महाराष्ट्राला जागं करण्यासाठी
Next Article अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांची इराणला धमकी

Latest News

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन
महाराष्ट्र May 31, 2025
राजधानीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी
देश - विदेश May 31, 2025
अहिल्यादेवी होळकर यांना जन्मत्रिशताब्दीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन
महाराष्ट्र May 31, 2025
देशात कोरोना रुग्णांची संख्या 2710 झाली
देश - विदेश May 31, 2025
अतिवृष्टी बाधित गावे मदतीपासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्या – जयकुमार गोरे
महाराष्ट्र May 31, 2025
शेतकऱ्यांच्या सुचनांना प्राधान्य – कृषीमंत्री
महाराष्ट्र May 31, 2025
महिलांनो, एसटी प्रवासात मोबाइल व दागिन्यांची घ्या विशेष काळजी
महाराष्ट्र May 31, 2025
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देणार – पालकमंत्री बावनकुळे
महाराष्ट्र May 31, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?