Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांची इराणला धमकी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांची इराणला धमकी

admin
Last updated: 2025/05/01 at 3:57 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

वॉशिंग्टन , 1 मे (हिं.स.)।अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांनी इराणला इशारा दिला आहे.हेगसेथ यांनी एका ठिकाणी बोलताना म्हंटल आहे की, इराणकडून हुती बंडखोरांना जे विघातक समर्थन आणि मदत दिली जात आहे, त्याची सगळी माहिती अमेरिकेला आहे.त्यामुळे आता याचे परिणाम इराणला भोगावे लागतील.

अमेरिकेचे संरक्षण मंत्री हेगसेथ म्हणाले की, “अमेरिका आपल्या पद्धतीने ठरवेल की, केव्हा आणि कशी कारवाई करायची आहे. तुमच्याकडून (इराण) हूती बंडखोरांना जे विध्वंसक पाठबळ दिलं जात आहे. त्याची सगळी माहिती आम्हाला आहे.” पुढे ते म्हणाले की, “आम्हाला माहिती आहे की, तुम्ही काय करत आहात. तुम्हाला हेही माहिती आहे की, अमेरिकेचे सैन्य काय करू शकते. तुम्हाला इशारा दिला गेला आहे. आता परिणाम भोगण्यासाठी तयार रहा”, असा धमकी वजा इशारा हेगसेथ यांनी इराणला दिला आहे.

संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांचे हे विधान अशावेळी आले आहे, जेव्हा लाल समुद्राच्या हद्दीत हूती बंडखोरांकडून व्यावसायिक जहाजांवर हल्ले केले जात आहे. अमेरिकेचा असा दावा आहे की, या हल्ल्यांमागे इराण आहे. त्यांची काहीतरी रणनीती आहे आणि त्यांचेच सैन्य हूती बंडखोरांना मदत करत आहे.

संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांच्या विधानाचे आंतरराष्ट्रीय राजकारणात वेगवेगळे अर्थ लावले जात आहे. कारण यापूर्वीही अमेरिकेने अनेकदा इराणला इशारा दिला आहे. इराणने या क्षेत्रात अस्थिरता निर्माण करणाऱ्या शक्तींना ताकद देणे बंद करावे, असे अमेरिकेने म्हटले होते. दुसरीकडे हूती बंडखोरांचा असा दावा आहे की, हा हल्ला अमेरिकेनेच केला आहे.

हुती बंडखोरांच्या गटाला इराणचे समर्थन आहे. त्यांनी उत्तर येमेनवर कब्जा केलेला आहे. पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ लाल समुद्रात हूती बंडखोर व्यावसायिक जहाजांना लक्ष्य करत आहेत. त्यामुळेच आता अमेरिका इराणविरोधात आक्रमक झाली आहे.

You Might Also Like

राजधानीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी

देशात कोरोना रुग्णांची संख्या 2710 झाली

नवीन वेळापत्रकानुसार कंपनीने ई-बसेसचा पुरवठा करावा – प्रताप सरनाईक

नव्या भारताने प्रतिशोधाची नवी ताकद दाखवली – पंतप्रधान

पाकिस्तानी मुस्लिमांनी धर्म विचारून हुिंदुंना मारले- प्रज्ञा ठाकूर

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article युजवेंद्र चहल ठरला आयपीएलमध्ये हॅटट्रिक घेणारा पहिला गोलंदाज
Next Article महाराष्ट्र राज्य स्थापना दिवसानिमित्त राज्यपालांचे ध्वजारोहण

Latest News

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन
महाराष्ट्र May 31, 2025
राजधानीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी
देश - विदेश May 31, 2025
अहिल्यादेवी होळकर यांना जन्मत्रिशताब्दीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन
महाराष्ट्र May 31, 2025
देशात कोरोना रुग्णांची संख्या 2710 झाली
देश - विदेश May 31, 2025
अतिवृष्टी बाधित गावे मदतीपासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्या – जयकुमार गोरे
महाराष्ट्र May 31, 2025
शेतकऱ्यांच्या सुचनांना प्राधान्य – कृषीमंत्री
महाराष्ट्र May 31, 2025
महिलांनो, एसटी प्रवासात मोबाइल व दागिन्यांची घ्या विशेष काळजी
महाराष्ट्र May 31, 2025
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देणार – पालकमंत्री बावनकुळे
महाराष्ट्र May 31, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?