Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: इस्त्रायलच्या जंगलात भीषण आग, देशात आणीबाणीची परस्थिती
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

इस्त्रायलच्या जंगलात भीषण आग, देशात आणीबाणीची परस्थिती

admin
Last updated: 2025/05/01 at 6:17 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

जेरुसेमल, 1 मे (हिं.स.)।इस्त्रायलची राजधानी जेरुसेमलच्या जंगलामध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.या घटनेत २३ जण गंभीर जखमी झाले आहेत. माहितीनुसार, ही आग बुधवारी (30 एप्रिल) रोजी लागली. त्यानंतर जोरदार वाऱ्यामुळे आग प्रचंड वेगाने पसरत आहे.या घटनेमुळे इस्त्रायलमध्ये आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे.हजारो नागरिकांना या आगीमुळे आपले घरे सोडून जावी लागली आहे.

सध्या या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. व्हिडिओमध्ये दिसून येत आहे की, आग किती भीषण आहे. ही आग इस्रायलच्या इतिहासातील सर्वात भीषण आग मानली जात आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी या घटनेला नॅशनल इमर्जन्सी म्हणून घोषीत केले आहे. सध्या अग्निशमन दल आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. परंतु आग इतकी भीषण आहे की, जेरुसेलम शहरापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. नेतन्याहू यांनी म्हटले आहे की, सध्याच्या क्षणी जेरुसेलमचे संरक्षण करणे महत्त्वाचे आहे.

आग विझवण्यासाठी शेकडे अग्निशमन दलाच्या गाड्या तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी लष्करी मदतही पुरवली जात आहे. इस्रायलच्या आपत्कालीन वैद्यकीय सेवने दिलेल्या माहितीनुसार, आगीत 23 जणांना गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. यामध्ये काहींना आगीत भाजल्यामुळे आणि काहींना धुरामुळे श्वास घेण्यास त्रास होत आहे. अनेक नागरिक या त्रासाने त्रस्त झाले आहेत.

या आगीमुळे तेल अवीव ते जेरुसेलमपर्यंतचे सर्व महामार्ग बंद करण्यात आले आहेत. अनेक नागरिकांना वाहने रस्त्यावरच सोडून जावी लागली आहेत. याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. व्हिडिओंमध्ये दिसून येत आहे की, संपूर्ण जेरुसेलमच्या परिसरात आकाशात धुराचे काळे ढग पसरलेले आहेत. पोलिसांनी अनेक भाग खाली करण्याचे आणि सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश नागरिकांना दिले आहे.

याआगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र इस्रायलचे राष्ट्रीय सुरक्षा मंत्री इटमार बेन यांच्या मते, ही आग जाणूनबुजून लावण्यात आले आहे. या संदर्भात एक संशयिताला अटक करण्यात आली आहे. इस्रायलने आंतरराष्ट्रीय मदतीची विनंती केली आहे. इटली क्रोएशिया आणि उत्तर मॅसेडेनियामधून अग्निशमक विमाने मदतीसाठी पोहचवली जात आहे. हेलिकॉप्टर्ने आग विझवण्याचे काम सुरु आहे.

—————

You Might Also Like

केदारनाथ मार्गांवर जंगलछट्टीजवळ दरड कोसळल्याने दोघांचा मृत्‍यू, तीन जखमी

हैदराबाद : विमानतळावर बॉम्ब स्फोटाची धमकी

काश्मीर मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी स्वीकारली जाणार नाही – पंतप्रधान मोदी

अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, इराणकडून इस्राइल विरोधात युद्धाची घोषणा

कोणताही देश दहशतवादाला पाठिंबा देत असेल तर त्याला त्याची किंमत मोजावी लागेल – पंतप्रधान मोदी

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article “तुम्हाला सुरक्षादलांना खच्ची करायचे आहे का..?”
Next Article भारताच्या निरंतर विकासामध्ये महाराष्ट्राची सर्वात महत्त्वाची भूमिका – मुख्यमंत्री

Latest News

केदारनाथ मार्गांवर जंगलछट्टीजवळ दरड कोसळल्याने दोघांचा मृत्‍यू, तीन जखमी
देश - विदेश June 18, 2025
आंध्रप्रदेश : गजरला रवीसह 3 जहाल नक्षलवादी ठार
महाराष्ट्र June 18, 2025
अकोला : अल्पवयीन मुलीवर अत्याचार
महाराष्ट्र June 18, 2025
नाशिकरोड-द्वारका उड्डाणपुलाचा मार्ग होणार मोकळा, खासदार वाजेंच्या मागणीला यश
Top News June 18, 2025
हैदराबाद : विमानतळावर बॉम्ब स्फोटाची धमकी
देश - विदेश June 18, 2025
निराधार बालकांना मिळणार आधार; बेवारस मुलांना मिळणार सन्मानाची ओळख
महाराष्ट्र June 18, 2025
भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेच्या शिष्यवृत्तीने दिलं स्वप्नांना बळ
महाराष्ट्र June 18, 2025
सांगलीच्या जयश्री पाटील यांचा शेकडो समर्थकांसह भाजपा प्रवेश
महाराष्ट्र June 18, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?