Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळाच्या तक्रारींसाठी ‘शी-बॉक्स’ पोर्टलवर नोंदणी अनिवार्य
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळाच्या तक्रारींसाठी ‘शी-बॉक्स’ पोर्टलवर नोंदणी अनिवार्य

admin
Last updated: 2025/05/03 at 12:36 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

अमरावती, 3 मे (हिं.स.)।

कामाच्या ठिकाणी महिलांचे होणारे लैंगिक शोषण रोखण्यासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. महिला व बालविकास मंत्रालयाने ‘शी-बॉक्स’ (SHe-Box – Sexual Harassment electronic Box) हे ऑनलाइन तक्रार निवारण पोर्टल सुरू केले आहे. आता या पोर्टलवर सर्व खाजगी आस्थापनांना नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई आणि निवारण) अधिनियम, २०१३ च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या कायद्यानुसार, ज्या आस्थापनांमध्ये १० किंवा त्याहून अधिक कर्मचारी आहेत, तेथे अंतर्गत तक्रार निवारण समिती असणे आवश्यक आहे.आस्थापनांनीhttps://shebox.wcd.gov.in/या संकेतस्थळाला भेट देऊन ‘Private Head Office Registration’ या पर्यायावर क्लिक करावे.

त्यानंतर आवश्यक माहिती भरून आणि मागितलेली कागदपत्रे (उदा. कंपनीचा नोंदणी क्रमांक, जीएसटी क्रमांक, पॅन क्रमांक) अपलोड करून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करता येईल. ‘शी-बॉक्स’ पोर्टलमुळे महिला कर्मचाऱ्यांना त्यांच्या तक्रारी ऑनलाइन नोंदवणे आणि त्याचा पाठपुरावा करणे सोपे होणार आहे. तसेच, प्रशासनाला या तक्रारींवर वेळेत आणि प्रभावी कार्यवाही करणे शक्य होईल. सर्व खाजगी आस्थापनांनी या निर्देशांचे पालन करून आपल्या संस्थेची ‘शी-बॉक्स’ पोर्टलवर त्वरित नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी केले आहे.

You Might Also Like

तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील दोन वारकऱ्यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू

पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा

एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल

वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article जम्मू- काश्मीर आणि गुजरातमध्ये भूकंपाचे धक्के
Next Article उत्सवामुळे महाबळेश्वरचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर जाणार – उपमुख्यमंत्री शिंदे

Latest News

तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा
महाराष्ट्र June 30, 2025
राजेश कुमार मीना महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव
Top News June 30, 2025
crime
सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल
सोलापूर June 30, 2025
पाण्याचा विसर्ग राहिल्यास वारकऱ्यांना चंद्रभागेच्या वाळवंटात थांबता येणार नाही
देश - विदेश June 30, 2025
crime
सोलापूर : सव्वासात लाखांच्या दुचाकी जप्त
Top News June 30, 2025
ललित मोदींना सर्वोच्च न्यायालयाचा झटका
देश - विदेश June 30, 2025
पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर
सोलापूर June 30, 2025
मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या
सोलापूर June 30, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?